Breaking News

नवरात्रीच्या नऊ दिवसात या चुका, चुकन सुद्धा करू नका नाही तर, माता दुर्गा होईल तुमच्या वर नाराज

हिंदू धर्मात नवरात्र उत्सवाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रात नऊ दिवस मां दुर्गाच्या नऊ प्रकारांची पूजा केली जाते. या नऊ दिवसात भक्त माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी पूजा करतात. धार्मिक मान्यतानुसार नवरात्रात नवदुर्गाची पूजा केल्यास आईला आनंद होतो आणि सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभते.

प्रेमाने आणि भक्तीने आईची उपासना केल्याने नेहमीच आईचे आशीर्वाद भक्तांवर असतात आणि आई भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. धार्मिक ग्रंथांमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांची उपासना आणि उपवास करण्याचे काही नियम सांगितले आहेत.

असे मानले जाते की नवरात्रात या नियमांचे पालन करणे फार आवश्यक आहे. धर्मग्रंथानुसार नवरात्रात या नियमांचे पालन न केल्यास आई रागावू शकते. चला तर माहिती करू या नवरात्रात काय करू नये.

दाढी, मूछ, केस किंवा नख कापू नये : जर तुम्ही नवरात्री व्रत ठेवले असेल तर ह्या नऊ दिवसात दाढी, मूछ, केस नख कापू नये. तसेच आपली नख सुद्धा कापू नये.

घर रिकामे सोडू नका : जर तुम्ही नवरात्री मध्ये घरामध्ये कळस स्थापन केला असेल किंवा अखंड ज्योती ठेवली असेल तर, आपण घर रिकामे ठेवून बाहेर जाऊ नये. जर काही महत्वाचे काम असेल तर घरातील कोणी ना कोणी घरात राहावे, सर्वच सदस्यांनी घरा बाहेर जाणे टाळावे.

लहसून, कांदा सेवन न करणे : धार्मिक शास्त्रा नुसार, नवरात्रीच्या दिवसात सात्विक अन्नाला विशेष महत्व आहे. आपण ह्या नऊ दिवसात कांदा, लहसून, मांसाहार, दारू वगैरे सारख्या गोष्टींचे सेवन करणे टाळावे. नवरात्रीच्या नऊ दिवस आपण पूर्ण सात्विक अन्न ग्रहण केले पाहिजे.

मळके, न धुतलेले कपडे परिधान करू नये : नवरात्रीमध्ये स्वच्छतेचे देखील विशेष महत्व ठेवले पाहिजे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस लवकर उठून लवकर आंघोळ केली पाहिजे आणि स्वच्छ कपडे परिधान केले पाहिजे. ज्या व्यक्तीने नवरात्री व्रत ठेवले आहे अशा व्यक्तीने मळके, न धुतलेले कपडे परिधान करणे टाळावे.

चामड्याच्या वस्तू वापरू नये : शास्त्रानुसार नवरात्री व्रत ठेवणाऱ्या व्यक्तीने चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे कि बेल्ट, चप्पल, शूज आदी वस्तू वापरू नये.

दिवसा झोपू नये : विष्णू पुराना नुसार नवरात्री व्रताच्या दरम्यान व्यक्तीने दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसात व्यक्तीने रिकाम्या वेळेमध्ये भजन, कीर्तन आणि दुर्गा मातेचे नामस्मरण करण्यात वेळ व्यतीत करावा.

पूजा करताना बोलू नये किंवा उठू नये : दुर्गा सप्तशती, दुर्गा चालीसा, मंत्र आदी पूजा करत असताना व्यक्तीने इतर कोणत्याही व्यक्ती सोबत बोलू नये, तसेच पूजा सोडून उठून जाऊ नये. जर पूजा करताना मध्ये अशा प्रकारे विघ्न करत राहिल्यास पूजा पाठाचे फळ नकारात्मक शक्तींना मिळते.

शा री रि क संबंध करू नये : शास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात संबंध करू नये. ह्यामुळे आपले मन धार्मिक कार्यामधून विचलित होते आणि व्यक्ती योग्य प्रकारे मनापासून धार्मिक कार्य पार पडू शकत नाही, योग्य ते फळ प्राप्त होत नाही.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About Vishal V

नियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.