Breaking News

चुकून देखील करू नका हे 5 काम, नाही तर तुम्हाला येईल शकते आर्थिक तंगी आणि सुरु होईल दुर्भाग्य

लोकांची इच्छा आहे की त्यांच्या घरात सुख सुविधांची कमतरता भासू नये. आपले घर धन धान्याने सदैव भरलेले राहावे, कोणत्याच गोष्टीची कधी कमी पडू नये, परंतु बर्‍याचदा वास्तुशास्त्राची माहिती नसल्यामुळे त्यांच्या मेहनती वर पाणी पडते, नुकसान होते.

वास्तुशास्त्रा नुसार घरी काही कामांकडे कधीही दुर्लक्ष करू नये, असे केल्याने आर्थिक संकटाचे दुर्दैव सुरु होते आणि धन नाश होते. अशा ठिकाणी धन देवी लक्ष्मी कधी राहत नाही, किंवा प्रवेश करत नाही त्याठिकाणी अलक्ष्मी प्रवेश करते आणि वास करते.

चला तर पाहूया अशी कोणती कामे आहेत जी वस्तूशास्त्र नुसार घरात करणे टाळली पाहिजेत.

१. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर पश्चिम दिशेला देवांचे खजिनदार, धन देवता म्हणजेच भगवान कुबेर यांचे स्थान मानले गेले आहे. अशा परिस्थितीत या दिशेला कधीही अंधार होऊ देऊ नये. अशी धारणा आहे कि, असे केल्याने अनावश्यक पैसे खर्च होतात आणि आर्थिक स्तिती खराब होते.

२. बरेचदा लोक घराच्या छतावर कचरा जमा करून ठेवतात. हे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की घराच्या छतावर कचरा जमा केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला आर्थिक अडचणींसह आयुष्यात दुर्दैवाला सामोरे जावे लागते.

३. वास्तुशास्त्रानुसार, दररोज घराबरोबरच मुख्य दरवाजा देखील नेहमी स्वच्छ केला पाहिजे. माता लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग हा घराचा मुख्य दरवाजा मानला जातो. अशा परिस्थितीत दरवाजा जवळ घाण, कचरा आणि शूज वगैरे ठेवू नये. असा विश्वास आहे की यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, आणि लक्ष्मी मातेला घरात प्रवेश करण्यापासून अडथळे निर्माण होतात.

४. लोक बर्‍याचदा घरात खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू जमा करून ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये अनावश्यक भांडणे आणि वादविवाद होतात व पैशाचे नुकसान होते.

५. असा विश्वास आहे की घरात कधीही तुटलेला आरसा, किंवा काचेच्या वस्तू ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार तुटलेला काचा ठेवल्याने कौटुंबिक कलह वाढतो. अशा परिस्थितीत वाहन किंवा घरात काच तुटल्यानंतर ती लगेचच बदली केली पाहिजे.

ज्या घरातमध्ये नकारात्म ऊर्जा असते त्याठिकाणी लक्ष्मी माता प्रवेश करत नाही. अशा ठिकाणी कधीही दुर्भाग्य राहते आणि दुःख, वाद विवाद, आजारपण चालू राहते. पैसा आला तरी तो टिकत नाही. काही ना काही मार्गाने तो खर्च होतो.

त्यासाठीच घरात शक्य होईल तेवढी स्वछता ठेवली पाहिजे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कुटुंबात प्रेम भावना राहील, चांगले आरोग्य राहील त्यामुळे आपले मन प्रसन्न राहील. दिवसातून कमीत कमी एकवेळा तरी देव पूजा करत जा ज्यामुळे करत प्रसन्न आणि चैत्यन निर्माण होईल.

लक्ष्मी माता अशाच घरात प्रवेश करते जेथे प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा असते, माता लक्ष्मीने आपल्या वर हि कृपा करावी आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी तिची स्तुती करा, प्रार्थना करा आणि लिहा “जय महालक्ष्मी माता”

टीप- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About Vishal V

नियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.