Breaking News

कोजागिरी शरद पौर्णिमेला करा हे उपाय, ज्यामुळे घरात राहील लक्ष्मीचा वास आणि तुम्ही बनलं मालामाल

हिंदू पंचांग नुसार शरद पूर्णिमा दरवर्षी अश्विन महिन्यात येते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमेचा दिवस शरद पूर्णिमा किंवा अश्विन पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. यावेळी, शरद पूर्णिमा शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 रोजी आहे. शरद पूर्णिमा विशेष मानली जाते. शरद पूर्णिमा वर्षभर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवसांपैकी सर्वात विशेष आहे. शास्त्रानुसार असे नमूद केले गेले आहे की या रात्री चंद्राचे सौंदर्य पाहण्यासाठी देवता गण स्वर्गातून पृथ्वीवर येतात. असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मीजी सुद्धा रात्री पृथ्वीच्या दर्शनासाठी येतात.

शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून अमृत उदयास येते. हा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. आज आम्ही शरद पौर्णिमेच्या दिवशी करावयाच्या काही उपायांची माहिती देणार आहोत. हे उपाय केल्याने आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शरद पूर्णिमेवर हा उपाय करा

१) शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी, पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून तुळशीचा दिवा व जल अर्पण करावे. जर तुम्ही हा सोपा उपाय केला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. याव्यतिरिक्त शरद पूर्णिमेवर देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करणे खूप शुभ मानले जाते.

२) शरद पूर्णिमाच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी तुम्ही सुपारी अर्पण करावी. पूजा केल्यावर तुम्ही सुपारीवर लाल धागा लपेटून अक्षदा, कुंकू, फुले इत्यादीसह त्याची पूजा करा आणि तिजोरीत ठेवा. आयुष्यात पैशांची कमतरता भासणार नाही.

३) शरद पूर्णिमे वर तुम्हाला सुख समृध्दी प्राप्त करायची असेल तर त्यासाठी खीर बनवा आणि ही खीर रात्री चंद्राच्या प्रकाशात खुल्या आकाशात ठेवा. असे मानले जाते की शरद पूर्णिमे वर चंद्र किरणांचा वर्षाव करतो. जर आपण खीर रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवला तर ते अमृत अंश देखील मिळते. शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण केल्याने संपत्ती, आर्थिक भरभराट, आनंद आणि समृद्धी मिळते.

४) शरद पौर्णिमेच्या रात्री खुल्या आकाशाखाली ठेवलेली खीर प्रसाद म्हणून ग्रहण करावी.

५) शरद पूर्णिमेला तुम्ही रात्री जागत राहिल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे नाव स्मरण केल्या शिवाय झोपू नका.

६) शरद पूर्णिमेला तुम्ही लक्ष्मीची पूजा करावी, तुमच्या सर्व ऋणातून मुक्तता होईल.

७) तुम्हाला जर तुमची सर्व कामे सिद्ध करायची असतील तर शरद पूर्णिमेच्या रात्री श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम वाचन करा. कार्य सिद्ध करण्यासाठी तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे मधुराष्टक वाचन करू शकता.

८) शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश सर्वत्र पसरलेला असेल तर त्या वेळी तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे तर तुम्हाला पैशाचा लाभ होईल.

९) आपण आपल्या राशी प्रमाणे लक्ष्मी मातेचा मंत्र जप करू शकता आणि त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता. आपल्या माहितीसाठी राशीनुसार लक्ष्मी मंत्र देत आहोत.

मेष : मंत्र- श्रीं

वृषभ : मंत्र- ॐ सर्वबाधा विर्निमुक्तो धनधान्यसुतान्वित:, मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:

मिथुन : मंत्र- ॐ श्रीं श्रीये नम:

कर्क : मंत्र- ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ

सिंह : मंत्र- ॐ श्रीं महालक्ष्म्यै नम:

कन्‍या : मंत्र- ॐ ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नम:

तुला : मंत्र- ॐ श्रीं श्रीय नम:

वृश्चिक : मंत्र-  ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नम:

धनु : मंत्र-  ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नम:

मकर : मंत्र-  ॐ श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौं ॐ ह्रीं क ए ई ल ह्रीं ह स क ह ल ह्रीं सकल ह्रीं सौं ऐं क्लीं ह्रीं श्री ॐ

कुंभ : मंत्र- ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मीयै ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नमः स्वाहा

मीन : मंत्र- ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नम:

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About Vishal V

नियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.