Breaking News

शनिदेवाचे करा हे उपाय, साडेसातीत देखील शनी महाराज होतील तुमच्या वर प्रसन्न

सर्व ग्रहांपैकी शनि सर्वात हळू फिरणारा ग्रह आहे. असे बोलतात कि, शनी महाराजांची तिरकी नजर ज्या व्यक्तीवर पडते त्या व्यक्तीच्या जीवनात समस्या येण्यास सुरुवात होते. ह्यासाठीच शनी महाराजां बद्दल बोलण्यास लोक घाबरतात.

शनी महाराजांना न्याय देवता मानले जाते. शनिदेव लोकांच्या कर्मा नुसार दंड किंवा पुरस्कार देतात. शनिदेव ज्या व्यक्ती वर आपली दया करत त्या व्यक्तीच्या जीवनात आनंद आणीत सौभाग्याने भरून टाकतात. जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात शनिदेवाची साडेसाती चालू होताच त्याच्या जीवनात अनेक समस्या, अडचणी येण्यास सुरुवात होते. त्या व्यक्तीस कोणत्याच कार्यात यश मिळत नाही, त्याला सतत अपयश येत राहते.

ज्योतिष शास्त्रामध्ये शनी ग्रहास खूप महत्व आहे. एखाद्या व्यक्तीचे सुख आणि त्रास हा त्याच्या जन्म कुंडलीतील शनी च्या स्थानावर अवलंबून असते. शनी कोणत्याही राशीत साडेसात वर्षे राहतो. एकूण 12 राशींना एकदा चक्कर मारण्यासाठी शनीला 30 वर्षे लागतात, म्हणजेच जर शनी कोणत्याही एक राशीमध्ये आला तर पुन्हा त्याच राशीत येणास त्याला 30 वर्षे लागतात.

शनी खूप हळू चालतो त्यामुळे त्याला एका राशी मधून दुसऱ्या राशी मध्ये जाण्यास अडीच वर्षे लागतात, अशा प्रकारे त्यांना सर्व 12 राशींमध्ये जाण्यासाठी 30 वर्षे लागतात. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात एकदा शनीची साडेसाती निश्चितच येते. शनिदेवाला न्यायाधीशां चा दर्जा आहे, अशा परिस्थितीत जे लोक आपल्या आयुष्यात चांगली कामे करतात त्यांच्या वर शनिदेव दयाळू असतात आणि ते सर्व प्रकारच्या आनंदांनी त्यांचे आयुष्य भरतात. चला, माहिती करून की शनी देव केव्हा केव्हा भरतात जीवनात आनंद.

ज्योतिष शास्त्रा नुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत तिसरा, सहावा, दहावा आणि अकरावा घरात शनी असल्यास त्याच्या जीवनात खूप सुख आणि आनंद असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात शनी सर्वात शुभ आणि मजबूत 36 आणि 42 वर्षी असतो. जर ह्या वर्षात शनी व्यक्तीच्या शुभ घरात असेल तर त्याला अनेक प्रकारे यश प्राप्ती होते.

जी व्यक्ती व्यक्ती आपल्या जीवनात वाईट सवयींपासून दूर राहते तिच्या आयुष्यात आनंद घेऊन येतात शनिदेव. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म शुक्ल पक्षाच्या रात्री झाला असेल आणि त्या वेळी शनीची चला वक्री असेल तर त्या व्यक्तीच्या जीवना वर शनीचा शुभ प्रभाव पडतो.

शनी ग्रहास शुभ करण्यासाठी काही उपाय

शनी देवाची पूजा करताना त्यांच्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे बघताना त्यांच्या डोळ्यात कधी हि बघू नये.

शनिदेवाची पूजा करत असताना मंदिरात हनुमानाचे देखी दर्शन करून त्यांची पूजा करावी. हनुमानाची पूजा केल्याने शनीचा आपल्या जीवनात शुभ प्रभाव पडतो.

शनी जयंती, शनी अमावस्या किंवा शनिवारी शनिदेवाची पूजा करताना ब्रह्मचर्य पालन जरूर केले पाहिजे.

शनी जयंतीला काळे तीळ आणि लोखंडी वस्तू दान करावे.

शनी देवाची पूजा करताना सर्व प्रथम त्यांच्या शरीरास तेल लावून मालिश केली पाहिजे, त्या नंतर स्नान करवावे.

गाय आणि कुत्र्यास तेल लावलेले पदार्थ खाण्यास द्यावे.

शनिदेवास दर शनिवारी तेल अर्पण करावे आणि गोरगरिबांना मदत केली पाहिजे, त्यामुळे शनिदेवाची अशुभ छाया पडत नाही.

शनिदेवास गर्व करणारी व्यक्ती आवडत नाही, ते त्या व्यक्तीची जरूर परीक्षा बघतात. त्यासाठी कधी हि आपण आपल्या कसल्याच गोष्टीचा गर्व करू नये, नेहमी नम्र राहून सर्वाशी प्रेमाने आणि आपले पणाने वागावे शनी देव लवकर प्रसन्न होतील, आपण त्याने स्मरण करून लिहा “जय शनिदेव”

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About Vishal V

नियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.