लग्नाआधी जोडीदाराची निवड नेहमी काळजीपूर्वक करायला हवी. आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय म्हणजे आपल्या स्वतःसाठी जोडीदाराशी निवडने करणे. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमचा जोडीदार चांगला असणं सर्वात महत्त्वाचं आहे. जोडीदार चांगला असेल तरच तुमचे आयुष्य आनंदी आणि आरामात जाते.
एकीकडे जोडीदाराची योग्य निवड तुमच्या आयुष्यात आनंद आणू शकते, तर दुसरीकडे चुकीचा निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, विवाह किंवा इतर कोणत्याही नातेसंबंधात जोडीदाराची परीक्षा घेणे खूप महत्वाचे आहे.

जीवनसाथी निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा आणि काळजी घ्या
1. प्रत्येक माणूस जीवनसाथी निवडताना शारीरिक सौंदर्य पाहतो त्याचे गुण नाही बघत, हे चुकीचे आहे व्यक्तीचे गुण बघावेत.
2. चाणक्याच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक सौंदर्याचा नव्हे तर त्याच्या संस्कार न्याय करणे खूप महत्वाचे आहे.
3. पुरुषाने कधीही सौंदर्य आणि सुंदर स्त्रीच्या मागे धावू नये. स्त्री मध्ये चांगले गुण असणे आवश्यक आहे.
4. चाणक्य नीतीनुसार स्त्री हुशार असते. ती गंभीर परिस्थितीत कुटुंबाला संभाळू शकते धीर देते आणि त्यांना दुःखातून बाहेर काढू शकते.
Chanakya Niti: चाणक्याच्या या गोष्टी ठेवा लक्षात, जीवनात होईल पैशांचा पाऊस, सर्वजण करतील नमस्कार
5. चाणक्यच्या मते, रागामुळे कोणतेही नाते आणि कुटुंब तुटून जाऊ शकते. म्हणूनच लग्नाआधी जोडीदाराला आपला रागाबद्दल सांगितले पाहिजे.
6. जीवनसाथी निवडताना एखाद्या व्यक्तीच्या चहेराच्या सौंदर्याकडे लक्ष देऊ नये, तर त्याच्या अंतर्गत गुणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
7. चाणक्य सांगतात की, लग्नाआधी व्यक्तीची परीक्षा करताना तो किती धार्मिक आहे हे बघावे, हे सर्वात महत्त्वाचे असते. धार्मिक कर्मांवर विश्वास ठेवणारी व्यक्ती अत्यंत समजदार असते.