Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये मनुष्य जीवना संबंधित काही गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचे पालन करून व्यक्तीला आपल्या जीवनात यश भेटेल. आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये काही अशा गोष्टीचा उल्लेख केला ज्या पासून लोकांनी थोडे लांबच राहिले पाहिजे.

गोड बोलणारे
आचार्य चाणक्यच्या नुसार व्यक्तीला गोड बोलणाऱ्या व्यक्ती पासून लांबच राहिले पाहिजे, असे लोक मनातल्या मनात षडयंत्र रचतात, असे लोक तुम्हाला बर्बाद करतात.
हे पण वाचा: जीवनामध्ये या गोष्टी गुप्त ठेवायला पाहिजे, नाहीतर शत्रू घेतील त्याचा फायदा
वाईट निर्णय घेणारे
अशा लोकांपासून अंतर ठेवा जे तुम्हाला चुकीच्या निर्णयासाठी प्रोत्साहन देतात. असे लोक तुम्हाला समोरून प्रोत्साहन देतात आणि मागून तुमची चेष्टा करतात.
वाईट विचार करणारे
आचार्य चाणक्य यांच्या अनुसार अशा लोकांपासून अंतर ठेवले पाहिजे जे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या बद्दल वाईट बोलतात. अशा व्यक्ती तुमच्याकडे दुसऱ्या बद्दल वाईट सांगतील तसेच ते तुमच्या बद्दल पण दुसऱ्यांना वाईट सांगतात. त्यामुळे अशा लोकांपासून लांबच राहावे.
मना मध्ये कपट ठेवणारा
अशा व्यक्तींना तुमचे चांगले झालेले बघवणार नाही, काही ना काही करून तुमच्या चांगल्या गोष्टीत अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या तोंडावर तुमचे चौतुक करतील पण मनातून तुमची फजिती कशी होईल त्याचे मनसुबे तयार करते. अशा व्यक्तींना ओळखून त्यांच्यापासून चार हात लांब राहा.