Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक महान राजनीतिज्ञ, कूटनीतिज्ञ, अर्थशास्त्री आणि समाजशास्त्री होते. त्यांच्याद्वारे सांगितल्या गेलेल्या धोरणांचे लोक आजपण आचरण करतात. ही धारणे आज पण तेवढीच संबंधित आहे. जेवढी पहिले संबंधित होती. या धोरणाच्या आधारावर आचार्यांनी एका साधारण मुलाला चंद्रगुप्त मौर्यला सम्राट बनवले होते.
आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये व्यापार, धन, नौकरी, शिक्षा आणि नात्यांशी संबंधित खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये काही अशा गोष्टी बद्दल सांगितले आहे, ज्यांना आपण वृद्ध अवस्थेत पर्यंत सोडलं नाही पाहिजे यामुळे व्यक्ति नेहमी आनंदीत राहतो चला पाहुया कोणत्या त्या गोष्टी आहेत.

अनुशासन
अनुशासनाने आत्मविश्वासाचा जन्म होतो. याने सर्व काम वेळेवर होतो. जी व्यक्ति अनुशासनाचे पालन करते ती जीवनात कोणावर पण निर्भर राहत नाही. असा लोकांना प्रत्येक मार्गावर यश मिळते, व्यक्तीला स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय लागते. यामुळे जीवनात कधी त्रास होत नाही, यामुळे स्वास्थ पण टिकून राहते. व्यक्तीने कधीपण अनुशासनात राहिले पाहिजे.
हे पण वाचा: Chanakya Niti: मिळालेले यश टिकून ठेवायचे असेल तर, चुकून हि करू नका ह्या चुका
धन
आचार्य चाणक्यांच्या मतानुसार नेहमी धनाला चांगल्या कामात उपयोग केला पाहिजे यामुळे तुम्हला वृद्ध वयात त्रास होत नाही. तुम्हाला म्हातारपणात कोणाच्या समोर हात पसरण्याची गरज भासत नाही. अस न करणाऱ्या व्यक्ती नेहमी दुखी राहतात यामुळे धनाचा चांगला वापर केला पाहिजे.
मदत
आचार्य चाणक्यांच्या मतानुसार दुसऱ्याची निस्वार्थ भावने ने मदत केली पाहिजे, याने तुम्हाला जीवनात त्रास होत नाही. दान आणि दया हा सर्वात मोठा धर्म मानला जातो, यामुळे नेहमी गरजु लोकांची मदत केली पाहिजे. असे केल्यानी तुमचे वृध्द वय शांतीने व्यतीत होते, दुसऱ्याची मदत करण्यासाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे यांनी तुम्हाल पुण्याची प्राप्ति होते.