Chanakya Niti: आचार्य चाणक्याच्या मते नीती शास्त्रमध्ये काही गोष्टीचा उल्लेख केला आहे. काही लोक नेहमी दुसऱ्याला कमी लेखतात, वाईट बोलतात, अपमान करतात. त्याबद्दल इथे चाणक्य यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे. या टिप्स फॉलो करून तुम्ही त्या व्यक्तीला धडा शिकवू शकता.

शांत रहा
काही वेळा समोरचे असे बोलून देता कि आपल्याला राग येईल. रागामध्ये तुम्ही पण असे काही बोलता कि नंतर तुम्हाला त्या गोष्टीमूळे तुम्हाला पश्चाताप होतो. अशा वेळेस शांत राहण्यातच फायदा आहे. अशा वेळेस आपल्या बुद्दीने काम करून स्वतःला शांत ठेवा.
Chanakya Niti: अशी लोक कोणाचेच दुःख समजू शकत नाही, त्यांच्या पासून दूर राहण्यातच फायदा आहे
मोठेपणा द्या
जर कोणी तुमच्यातील कमतरता शोधून तुमचा अपमान करत असेल. तुम्हाला कमीपण दाखवत असेल तर तुम्ही अशा वेळेस त्या माणसाला गोड बोलून मोठेपणा द्या असे केल्याने समोरची व्यक्ती तुमचा अपमान करताना विचार करेल.
वाणी वर नियंत्रण ठेवा
समोरच्याला कधी हि कमी समजू नका. बोलताना नेहमी आपल्या वाणी वर नियंत्रण ठेवा. कोणाला हि अपशब्द बोलू नका. संयम ठेवून शांत पणे समोरच्या माणसाला उत्तर द्या. तुमची बाजू बिनधास्तपणे मांडा पण स्वतःवर नियंत्रण ठेवा.
स्तुती करा
वाईट बोलणाऱ्यांची स्तुती करा. तुम्ही किती चांगले व्यक्ती आहात ते त्यांना सांगा. तुम्ही इतरांची काळजी घ्या. आपण इतरां बद्दल किती विचार करतो ? सगळांना किती साथ देतात. तुम्ही नेहमी लोकांना साथ देता. असे बोलून तुम्ही त्यांची स्तुती करू शकता.