Breaking News

Chanakya Niti: भू दान, कन्यादान आणि अन्नदान पेक्षा पण श्रेष्ठ एक दान आहे, जाणून घ्या ते कोणते दान आहे

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे भारतातील त्या दिग्गज राजकारण्यांपैकी एक होते, ज्यांनी चंद्रगुप्त मौर्य या आपल्या सामान्य मुलाला, संपूर्ण राजवटीचा सम्राट बनवले. राजकारण आणि राज्यकारभाराशी निगडीत मुद्द्यांचे अनुभवी चाणक्य यांनीही जीवनाविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे म्हणणे आजही खरे ठरते. चाणक्यांनी लिहिलेले नीति शास्त्र आज पण लोकांसाठी यशाचा मूल मंत्र सिद्ध होऊ शकतो. मार्गदर्शनासाठी आज पण लोक त्याला आपल्या जीवनात लागू करतात.

Chanakya Niti dhoran
Chanakya Niti: भू दान, कन्यादान आणि अन्नदान पेक्षा पण श्रेष्ठ एक दान आहे, जाणून घ्या ते कोणते दान आहे

चाणक्यांनी आपल्या नीति ग्रंथात दान करण्याचे विशेष महत्व सांगितले आहे. त्यांच्या मतानुसार दान करणाऱ्यांना जीवनात कधी-कधी याचे  शुभ लाभ प्राप्त होते. चाणक्य सांगतात की भू दान, कन्यादान, वस्त्रदान आणि अन्नदान यापेक्षा पण श्रेष्ठ एक दान असते, ज्यामुळे आपण दुसऱ्याच्या जीवनात मोठा बदलाव आणू शकतो इथे आम्ही तुम्हाला त्याच बाबतीत सांगणार आहोत.

बघुया चाणक्यांच्या मतानुसार जगात कोणते दान सर्वश्रेष्ठ असते 

केवळ आचार्य चाणक्यच नाही तर हिंदू धर्माच्या धर्मग्रंथातही सांगितले आहे की दान करणे किती चांगले आहे. तसेच ते गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसाला त्याच्या क्षमतेनुसार जीवनात दान करत राहिले पाहिजे.

आचार्य चाणक्य सांगतात की तुम्ही भू दान, वस्त्रदान, अन्नदान व इतर दान करत असाल पण या सगळयात मोठे दान असते विद्याचे दान. चाणक्यानी आपल्या पूर्ण जीवनामध्ये ज्ञान वाटण्याच्या नीतिला आत्मसाथ केले, यामुळे लोक आज पण याचा फायदा उचलतात.

हे पण वाचा: कोणाचे व्यक्तिमत्व तपासण्यासाठी लक्षात ठेवा चाणक्याच्या या ३ गोष्टी, कधी नाही होणार धोका

चाणक्य नीतीनुसार विद्या ही कामधेनू गाईसारखी आहे, जी कधीही इच्छा पूर्ण होण्यास थांबत नाही. ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कधीही खर्च होऊ शकत नाही. ते जितके जास्त वितरित केले जाते तितके ते वाढते. ज्ञानाच्या सामर्थ्यात जग बदलण्याची क्षमता आहे, म्हणून ती सर्वांसोबत शेअर केली पाहिजे.

चाणक्य सांगतात की भू दान, वस्त्रदान करून कोणाचे काही वेळा पुरते चांगले होऊ शकते पण जर कोणाला ज्ञान वाटुन त्याचे चांगले होत असेल तर त्याचे फळ त्याला आयुष्यभर मिळत राहते. एवढेच नाही तर त्याचा फायदा त्याची येणारी पिढी पण उचलते.

चाणक्य नीति सांगतात की दुसऱ्या वस्तुचे दान करणे चांगली गोष्ट आहे पण तुम्ही ज्ञानाचे दान करतात, त्यामुळे संपूर्ण समाजाचे कल्याणही यामधून होऊ शकते. ज्ञान स्वतःकडे ठेवणे हे एक प्रकारचे पाप आहे. विनाखर्च कुणाचे भले करायचे असेल तर ज्ञान वाटून घ्यावे.

About Leena Jadhav