Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीती या आजच्या काळात देखील लोकांना मार्गदर्शन करतात. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनूष्य जीवनात जोडणाऱ्या पैलूंचे विस्ताराचे वर्णन केले आहे. त्यांच्यामुळे माणसाचे आयुष्य तर सुधारतेच पण त्याला प्रत्येक टप्प्यावर यशही मिळते.
आपल्या नीतिशास्त्र मध्ये आचार्य चाणक्य म्हणतात अशी काही गोष्टी आहे ज्या मनुष्याने गुप्त ठेवायला पाहिजे. आचार्य चाणक्यांनी जर या गोष्टी सार्वजनिकपणे घडल्या तर त्या व्यक्तीचा आदर तर कमी होईलच, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याला लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागेल असे सांगतिले आहे.

या गोष्टी कडे ठेवा लक्ष
चाणक्य नीतीनुसार घरा मध्ये ज्या गोष्टीची कमी आहे ती जर बाहेरच्या लोकांना सांगितलेली, तर परिवाराची बदनामी होईल. यासाठी त्या आपल्या आपल्यात समजून घ्या. घरातले दोष दुसऱ्या कोणाला सांगितले ते त्याचा फायदा ते घेऊ शकतात.
चाणक्याच्या अनुसार, व्यक्तीने काही विशेष आणि सिद्ध औषधांची संपूर्ण माहिती नेहमी गोपनीय ठेवावी. ही औषधे इतरांच्या उपचारात मदत करू शकतात. चाणक्य म्हणतात कि सिद्ध औषधांची माहिती गुप्त ठेवणे चांगले.
हे पण वाचा: तुम्हाला सुखी वैवाहिक जीवन हवे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा
चाणक्य म्हणतात कि आपल्या वैवाहिक जिवनात किती पण उथल-पुथल असली तरी ही या गोष्टीं बद्दल कोणालाही माहिती व्हायला नको.
एखाद्या ठिकाणी जर आपला कोणी ही अपमान केला तर या गोष्टी कधीही कोणाला माहिती व्हयला नको. यामुळे लोक तुमची थट्टा उडवायला नको. आचार्य चाणक्याचे असे म्हणणे आहे कि, माणसांनी आपले वय पण कोणाला सांगायला नको. जर तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही याबाबत कोणतीही अचूक माहिती देऊ नका.