Breaking News

Chanakya Niti: या लोकांच्या जवळ धन टिकत नाही, सतत राहते पैशांची कमतरता

Chanakya Niti: आचार्य चाणक्य एक महान विद्वान ज्यांच्या नीती आज पण प्रासंगिक आहे. चाणक्य एक कूटनीतिज्ञ, राजनीतिज्ञ आणि समाज सेवक होते. त्यांच्या नीती इतक्या प्रभावी होत्या कि त्यांनी एका साधारण मुलाला चंद्रगुप्त मौर्यला शासक बनवले.

चाणक्य नीती मध्ये पति-पत्नीच्या नात्या मध्ये पारिवारिक जीवन आणि यश यांना घेऊन काही मत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. चाणक्य म्हणतात कि काही लोकान जवळ धन थांबत नाही. जाणून घ्या कोणत्या लोकांना पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो आणि त्याची काय कारण आहेत.

Chanakya Niti gyan 1
Chanakya Niti: या लोकांच्या जवळ धन टिकत नाही, सतत राहते पैशांची कमतरता

चुकीच्या पद्धतीने कमावलेले धन

आचर्य चाणक्य म्हणतात कि चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा एकावेळी गळ्यात पडू शकतो. अशी संपत्ती हातात राहत नाही, शास्त्रात लिहिले आहे असे धन हातात टिकत नाही, या प्रकारचे धन काही वेळ आनंद देऊ शकतो. शास्त्रात असेही लिहिले आहे की, अशी संपत्ती हातात राहत नाही, पण ती हातातून निघून जाते हे निश्चित मानले जाते. अशा प्रकारे कमावलेला पैसा माणसालाच दुःख देऊ शकतो.

हे पण वाचा: आचार्य चाणक्यांच्या मते अशी महिला पुरुषसाठी असते भाग्यशाली

धोक्याने किंवा दगा देऊन कमावलेले धन

चाणक्य नीती नुसार धोक्याने कमावलेला पैशामुळेही जीवनात दु:ख आणि अशांतता येते. आचार्य सांगतात की, ह्या प्रकारचा  पैसाही टिकत नाही, धन धोक्याने कमावलेले असल्याने माता लक्ष्मी नाराज होऊन जाते. हि चूक त्यांना विनाशाकडे घेऊन जाते. हातात धन टिकवणे व्यतिरिक्त असे लोक कर्जामध्ये बुडून जातात.

कौटुंबिक किंवा इतर समस्या 

समस्यांमुळे कामामध्ये मन लागत नाही, असे प्रसंग येत राहिल्यास आयुष्यात अडचणी यायला वेळ लागत नाही. चाणक्य नीतीनुसार जो व्यक्ती आपल्या कामाबद्दल गंभीर नाही त्याला पैशाची कमतरता किंवा गरिबीचा सामना करावा लागतो.

About Leena Jadhav