Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये माणसाच्या जीवना संबंधित खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचे पालन करून व्यक्ति आपल्या जीवनाला सफल बनवु शकतो. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये प्रत्येक क्षेत्राचा उल्लेख केला आहे.
या धोरणाचे पालन करून माणुस आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या संकटाला पार करू शकतो. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये तरुणा संबंधित खुप गोष्टी सांगितल्या आहे. या गोष्टीचे पालन करून तरुण कधी भटकू शकत नाही. आचार्य चाणक्यांच्या मतानुसार तरुणात कोणत्या सवयी नसल्या पाहिजे ते सांगतिले चला पाहूया त्या सवयी.

राग – राग व्यक्तिचा सर्वात मोठा शत्रु मानला जातो. माणसांनी कधी चिडचिड करू नये, यामुळे माणसाची विचार करण्याची आणि समजुन घेण्याची क्षमता कमी होते. यामुळे कधी पण रागाला स्वतःवर हावी होऊ देऊ नये.
आळस – चाणक्याच्या मते, व्यक्तीने कधीही आळशी नसावे. यामुळे माणूस आयुष्यातल्या अनेक चांगल्या संधींना गमावतो, ज्याचा त्याला नंतर पश्चाताप होतो. आळशीपणामुळे माणूस आयुष्यात कधीही यश मिळवू शकत नाही.
हे पण वाचा: आचार्य चाणक्यांच्या मतानुसार या प्रकारचे धन मानले जाते सर्व श्रेष्ठ, जाणून घ्या ते कोणते धन आहे
नशेची सवय – नशा कोणती ही असो, ती व्यक्तीसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे तुमचा मानसिक आणि शारीरिक नाश होतो. यामुळे तुमच्या आरोग्याची मोठी हानी होते. म्हणूनच दारू, सिगारेट आणि तंबाखूचे सेवन टाळावे.
वाईट माणसाची संगत – आचार्य चाणक्यांच्या मतानुसार व्यक्तिच्या सोबत राहणाऱ्या लोकांची जीवनात मोठी भूमिका असते. चांगल्या लोकांची संगत तुम्हाला यशाकडे घेऊन जाते, तसेच वाईट लोकांची संगत तुम्हाला वाईट मार्गावर घेऊन जाते. यामुळे माणसाने आपली सांगत हुशारीने निवडली पाहिजे.