Chanakya Neeti: राग ही नैसर्गिक क्रिया आहे. पण अनेकवेळा आपण नकळतपणे राग राग करतो. त्यामुळे आपले कामच बिघडते असे नाही तर लोकांसोबतचे नाते ही बिघडते. म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी विचार करून बोलावे असे म्हटले आहे. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीने परिस्थितीनुसार स्वतः मध्ये बद्दल केले पाहिजे. अनेकवेळा आपल्याला राग आल्यावर काय करावे हे समजत नाही, त्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जातात. जास्त राग आल्यास काय करावे हे ह्यासाठी चाणक्य नीती (Chanakya Neeti) मार्गदर्शक सिद्ध होऊ शकते.

विचारपूर्वक बोला
अर्चाय चाणक्य म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने विचार करूनच बोलावे. केव्हा, काय आणि कसे बोलावे हे समजून घेणे महत्वाचे आहे कारण एकदा बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. चाणक्याच्या बोलण्याचा तात्पर्य असा आहे की वाणीच्या सहाय्याने माणसाच्या मनात आदर निर्माण करता येतो. अनेकवेळा असे होते कि मनुष्यच्या जीवनात अनेक समस्या किंवा कठीण प्रसंग येतात जेव्हा तो रागात असतो.
हे पण वाचा : Chanakya Niti: दान करण्याला व्यक्तीला का मानले जाते श्रेष्ठ? जाणून घ्या
वाणी वर नियंत्रण ठेवा
माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा तो फार रागात असतो त्याला कळत नाही कि, किती वाईट विषारी शब्द बोलले जात आहे. जेव्हा त्याच माणसाचा राग शांत होतो आणि त्याला त्याने स्वतः बोललेले शब्द आठवतात तेव्हा तो पश्चाताप करू लागतो. म्हणूनच असे म्हणतात की, नेहमी वाणी वर नियंत्रण ठेवावे. बोलतांना आपण जे काही बोलतो आहे त्याचा परिणाम काय होणार आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
लगेच प्रतिक्रिया देऊ नका
आचार्य चाणक्य असेही म्हणतात की, कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नये. कुणी काही बोललं तर आधी त्याचा विचार करायला हवा. तात्काळ प्रतिसाद दिल्याने अनेक वेळा आपल्याला योग्य शब्द वापरता येत नाहीत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो.