Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल लिहिले आहे. आचार्य चाणक्य यांच्यामते काही असे लोक असतात, ज्यांच्यावर देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद असतात.
महान अर्थशास्त्री आचार्य चाणक्ययांनी आपल्या नीतिशास्त्र या ग्रंथामध्ये धन संबंधी अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नितीमध्ये सांगितले आहे कि, माता लक्ष्मी काही लोकांवर विशेष कृपा करते, तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणती काम करावी ते देखील सांगितले आहे.

मनुष्य जीवनात धनसंपत्ती शिवाय जीवन जगणे शक्य नाही. परंतु चुकीच्या मार्गाने कमावलेले धन मनुष्याच्या जीवनात खूप संकट आणि चिंता घेऊन येतात. जर धनाचा वापर वाईट गोष्टींसाठी केला तर आयुष्य खराब होऊ शकते. ह्यासाठी नेहमी धनवान होण्यासाठी आणि सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी योग्य मार्गाने धन कमावणे आणि त्याचा सदुपयोग करणे अशा काही नियमांचे जीवनात पालन करणे जरुरी आहे.
ज्ञान प्राप्त करणारे:
जे लोक नेहमी आपल्या ज्ञानात भर करतात ते आपल्या जीवनात खूप यशस्वी होतात. आपल्या ज्ञानाच्या बळावर ते समाजात मान सन्मान प्राप्त करतात आणि धनवान होतात.
हे पण वाचा : Chanakya Niti: मुलांसमोर चुकूनही करू नका अशा गोष्टी, नाहीतर करावा लागेल पश्चाताप
मेहनती:
आचार्य चाणक्य यांच्या नुसार महेनती लोकांवर माता लक्ष्मी नेहमी कृपावंत राहते. अशा लोकांना उशिरा का होईना जीवनात यश नक्की मिळते, माता लक्ष्मी अशा लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ देतेच.
ईमानदार:
आचार्य चाणक्य यांच्यामते, काही लोक आपल्या कामाच्या बाबतीत खूप ईमानदार राहतात, त्यांच्या दृष्टितने सर्व जबाबदाऱ्या ह्या योग्य रीतीने सांभाळल्या जाव्या त्यात जरा हि कुचराई त्यांना आवडत नाही. अशा लोकांवर माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि अशा ईमानदार लोकांना समाजात मान सन्मान प्राप्त होतो आणि त्यांची प्रगती होत राहते.
दान धर्म करणारे:
असे खूप लोक आहेत जे आपल्या उत्पन्नातून काही ना काही भाग हा दान धर्मासाठी वापरतात. अशा व्यक्ती गोरगरिबांना कुठल्याना कुठला प्रकारे मदत करतात. शिवाय धार्मिक कार्यात देखील त्यांची सर्व प्रकारची मदत करत असतात. अशा दयाळू दानशूर व्यक्तींवर लक्ष्मी मातेची कृपा राहते.