Chanakya Niti: प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात भरपूर यश मिळावे व अधिकाधिक पैसा मिळावा हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्याच्यासाठी लोक खूप मेहनत करतात पण अपयशाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, व्यक्ती नाराज झालेली असते आणि काहीही विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या मनस्थितीत नसते. अशा परिस्थितीत जर तुम्हीही अपयशाचा सामना करत असाल आणि जीवनात निराश झाला असाल तर आचार्य चाणक्यांच्या काही धोरणांचे अवश्य पालन करा.

आचार्य चाणक्यांच्या या धोरणांचे पालन करा
- चाणक्या यांच्या मतानुसार जो वेळेला महत्त्व देतो त्याला यश मिळते, माणसाने कोणतेही काम वेळ पाहूनच सुरू करावे.
- चाणक्य यांच्या मतानुसार योग्य वेळी नवीन काम सुरु केल्याचे तुम्हाला यश नक्कीच मिळू शकते.
- प्रत्येक माणसाला मित्र आणि शत्रू यातील फरक कसा करायचा हे माहित असले पाहिजे. लोक शत्रूंपासून सावध राहतात पण, मित्र म्हणून सोबत असलेल्या शत्रूंकडून त्यांची फसवणूक होते.
- प्रत्येक माणसाला जे काम सुरु करायचे आहे त्याची माहिती असली पाहिजे. आचार्य चाणक्यांच्या मते माहितीचा अभाव हि व्यक्तीची सर्वात मोठी कमजोरी आहे.
- प्रत्येक नात्यामागे काही ना काही स्वार्थ असतो, कामाच्या ठिकाणी आणि आपल्या वैयक्तिक जीवनालाही हे लागू होते.
- आपले नातेवाईक असो किंवा मित्र, सहकारी असोत, प्रत्येकाचा पाया कोणत्या ना कोणत्या स्वार्थावर असतो. त्यामुळे तुमचे मित्र काळजीपूर्वक निवडा, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.