आचार्य चाणक्य यांनी नैतिकतेने जगण्याबाबत खूप सल्ला दिला आहे. त्याच्या म्हणण्यातील एक गोष्ट म्हणजे मुलांना अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी न करण्याची काळजी घेणे. अशा काही गोष्टींवर एक नजर टाकूया ज्या त्यांच्या आजूबाजूला करणे कधीही योग्य नाही.

अपमान:
आचार्य चाणक्य यांच्यामते आई-वडिलांनी कधी हि मुलांसमोर एकमेकांचा अपमान करू नये किंवा अपमान होईल असे वागू नये. नेहमी एकमेकांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. ह्यामुळे मुलांच्या नजरेत तुमचा आदर आणि सन्मान वाढेल.
हे पण वाचा : Chanakya Niti: आचार्य चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मिळेल शत्रूंवर विजय
कमतरता काढू नका:
चाणक्ययांच्या मते आई वडिलांनी कधी हि मुलांच्या समोर एकमेकांच्या कमतरता काढू नये. जर तुम्ही असे करत असाल तर मुलांच्या नजरेत तुमचा सन्मान कमी होऊ शकतो.
भाषा:
आचार्य चाणक्य यांच्यानुसार कधी हि मुलांच्या समोर अपशब्द बोलू नये, वाईट शब्दांचा वापर करू नये. नेहमी मुलांसमोर बोलताना आपल्या भाषेचा, शब्दाच्या वापर करताना सावध राहिले पाहिजे. त्यांच्या समोर चांगल्या आणि योग्य शब्दांचा वापर करावा, कारण मुले आपल्या कडूनच भाषा आणि शब्द शिकतात.