Chanakya Niti: ज्याच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यांच्या घरची संपत्ती कधीही कमी होत नाही. अशा परिवाराला सुख संपत्ती सोबत पैशाचा पण लाभ होतो. आचार्य चाणक्य यांनी पैशाला घेऊन काही विचार मांडले आहेत. आचार्य चाणक्य यांनी देवी लक्ष्मीला खुश करण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहे. या गोष्टी विचारात घेतल्या तर महालक्ष्मी नेहमी आपल्या घरात नांदत राहील. आपल्या घरात धनाचा अभाव राहणार नाही. बघू या पैशाला घेऊन चाणक्य नीती काय म्हणतात.

चाणक्य यांच्यामते असे करा देवी लक्ष्मीला खुश
चाणक्य म्हणतात नात्या सोबत पैशाची कदर करायला पाहिजे. कारण हे दोघे ही कमवणं कठीण आणि गमावणे सोपे. पैशाचा दिखावा करण्याच्या चक्कर मध्ये संपत्तीची बर्बादी करू नये.
चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती अनावश्यक खर्च न करता, बचती वर लक्ष देते त्यांचा वर महालक्ष्मी मेहेरबान राहते. जीवन सरळ आणि सुखमय बनेल. वाईट काळात हि बचत संकटा मधून आपल्याला वाचवते.
Chanakya Niti: चाणक्याच्या या गोष्टीत लक्ष्यात ठेवल्या तर पडेल पैशांचा पाऊस, प्रत्येक जण करेल सलाम
चाणक्य नीती नुसार ज्या परिवारात एकता असते आणि एकमेकांबद्दल नेहमी प्रेम राहते तिथेच देवी लक्ष्मी वास करते. मोठ्यांचा सम्मान आणि महिलांचा जिथे आदर होतो त्या घरात धनाची कधीही कमी होत नाही.
चाणक्य म्हणतात कि नात्या मध्ये कधीही पैसा यायला नाही पाहिजे. कारण नात्याची तुलना जेव्हा पैशाशी होते तेव्हा नात्या मध्ये दुरावा निर्माण होतो. हा दुरावा हळूहळू वाढतच जातो.
आचार्य चाणक्य म्हणतात कि लक्ष्मी देवी फक्त तितेच विराजमान होते जिथे सुख शांतीचे वातावरण आहे. यासाठी आपल्या आजूबाजूच्या वातावरणात शांती बनून ठेवा.
माता लक्ष्मीला फार चंचल मानले जाते. चाणक्याच्या मते, ज्यांना पैशाचा गर्व असतो, ते लवकरच गरिबीच्या उंबरठ्यावर येतात.