Chanakya Niti: यश मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मनापासून परिश्रम करत असतो. पण यश मिळाल्यावर अनेक शत्रूही आपोआप निर्माण होतात. यश मिळाल्यानंतर जर तुमच्यासोबतही असेच होत असेल तर तुम्ही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले विचार अंमलात आणले पाहिजे. चाणक्याच्या मते यश मिळविण्यासाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हाच शत्रूंना वेळीच पराभूत करण्याचा मार्गही शिकणे आवश्यक आहे.

चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने कधीही आपल्या शत्रूला कमी समजू नये, अन्यथा तुमचा शत्रू तुमचे नुकसान करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया की आचार्य चाणक्य यांच्या वचनांचे पालन केल्याने आपण शत्रूचा सहज पराभव करू शकतो.
आचार्य चाणक्यांचे हे वाक्य ठेवा लक्षात
चाणक्य त्यांच्या नीतिशास्त्रात सांगतात कि, माणसाने प्रतिकूळ परिस्तिथीत देखील सकारात्मक विचार ठेवले पाहिजे. काही वेळेस शत्रून समोर तुमचा पराभव दिसत असला तरी धीर सोडू नये.
चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीने आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले पाहिजे. क्रोधात काही वेळेस व्यक्ती विवेक सोडून देतो. क्रोधात असणारी व्यक्ती असे काही निर्णय घेऊ शकतो, जे त्याच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो.
Chanakya Niti: या प्रवृत्तीचे लोक दुसऱ्यांच्या स्वार्थीपणाचे बळी होतात
चुकीचे निर्णय घेतल्याने शत्रुंना संधी मिळते, त्यासाठी शांत डोक्याने विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे.
चाणक्यनीती सांगते कि, शत्रूला कमजोर समजू नका. जर शत्रू तुमच्यापेक्षा कमजोर आहे असे वाटत असेल तरी हि त्याच्या शक्तीचे पूर्ण आकलन केले पाहिजे.
जर समजा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा शक्तिशाली असेल तर तुम्ही त्याच्या नुसार चालले पाहिजे. त्याला कधी हि कसली संधी तुमच्या कडून केली जाणार नाही ह्याची काळजी घ्या आणि तुम्हाला संधी असेल तेव्हा त्याच्या वर घाव करा.