Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक महान मुत्सद्दी, रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ होते. आचार्य चाणक्य यांची धोरणे आजही प्रसिद्ध आहेत. लोक आजही आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतात. या धोरणांचे पालन करून व्यक्ती आपले जीवन यशस्वी करू शकतो. यांचा धोरणांच्या जोरावर आचार्य चाणक्याने एका सामान्य मुलाला चंद्रगुप्ताला सम्राट बनवले. या धोरणांचे अनुसरण करून, आपण सर्वात मोठ्या समस्येवर सहज मात करू शकता. निती शास्त्रामध्ये पैसा संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या मार्गांनी पैशाचा वापर करून, तुम्ही संकटकाळातही आनंदी राहू शकता.

योग्य वापर
आचार्य चाणक्य यांच्या मते दान, संरक्षण आणि गुंतवणुकीच्या रूपात पैशाचा वापर करणे खूप चांगले आहे. पैशाचा वापर जपून काळजी पूर्वक करावा, पैशाचा योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी वापर करणे खूप महत्वाचे आहे. अनावश्यक खर्च टाळावा. त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते अन्यथा ते तुम्हाला अडचणीत आणू शकते. यामुळे तुम्हाला दुःख आणि गरिबीचा सामना करावा लागू शकतो.
बचत
आचार्य चाणक्याचे मते माणसाला पैशाची बचत करायला हवी. यासाठी विनाकारण खर्च होऊ देऊ नका. सांभाळून ठेवलेला पैशा वाईट प्रसंगाच्या वेळी कामात येतो. यामुळे आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिति आली तरीही त्यांच्याशी सामना करू शकतो, कोणा समोर हात पसरायची गरज पडत नाही.
Chanakya Niti: सुखी पैशांचा असा करा उपयोग, नेहमी राहाल सुखी समाधानी
दान
आचार्य चाणक्य यांच्या मते दोन्ही हातानी दान केले पाहिजे. दान करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे पैसे दुप्पट होतात. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते. यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही तुमचे नुकसान होत नाही.
सांभाळ
पैशे सांभाळून ठेवणे फार जरुरी आहे. आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थितीत आली तरीही त्यामधून सुद्धा आपण बाहेर पडू शकतो. सावधगिरीने पैशा खर्च करा. आपल्या गरजा मर्यादित करा. जे लोक हे करत नाहीत ते नेहमीच नाराज असतात. पैसा नसल्यावर अडचणीत येत असतात.