Chanakya Niti: जीवनात प्रत्येकाला यशस्वी बनायचे आहे. चाणक्यांनी आपल्या नीती धोरणात अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्या मनुष्याला यशस्वी करू शकतात. मनुष्य ज्या लोकांच्या सोबत राहतो, ज्यांच्या संगतीत असतो त्यांचा प्रभाव त्याच्या वर होतो. तुमच्या यशात आणि अपयशात त्यांच्या प्रभावाचा परिणाम असतो. चाणक्याच्या मते काही लोक असे असतात ज्यांच्यापासून नेहमी दूर राहिले पाहिजे. चला तर माहिती करून घेऊया त्या लोकांबद्दल.

देवाला दोष
चाणक्य सांगतात कि, जी व्यक्ती स्वतःच्या अपयशासाठी देवाला जबाबदार धरते, देवाला दोष देते अशा लोकांपासून तुम्ही दूर राहिले पहिजे. अशा लोकांमुळे तुम्ही देखील नकारात्मक होऊ शकता. अशा नकारात्मक विचारांच्या लोकांना कोणी खुश करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही देखील अशा लोकांपासून दूर राहिलेले चांगले.
Chanakya Niti : आचार्य चाणक्या यांनी सांगितलेल्या या 6 गोष्टी, नेहमी लक्षात ठेवाव्यात..
मूर्ख लोक
चाणक्य त्यांच्या नीतिशास्त्रात सांगतात कि, व्यक्तीने मूर्ख लोकांच्या संगतीत राहू नये. मूर्ख लोकांना एखादी गोष्ट समजावून सांगण्यात स्वतःचा वेळ वाया घालवू नये, कारण अशा लोकांना तुम्ही किती हि समजावले तरी ते कोणाचे हि ऐकत नाही. म्हणजेच अशा लोकांसाठी ऊर्जा खर्च करून तुम्ही स्वतःचे नुकसान करून घ्याल.
टीम वर्क
चाणक्य सांगतात कि, बुद्धिमान व्यक्ती कोणते हि काम नेहमी टीम वर्क ने काम करण्यावर विश्वास ठेवतात. टीम बनवून काम करण्याने त्यांना कामात यश मिळते आणि सतत यशस्वी होतात.