Breaking News

Chanakya Niti: सुखी पैशांचा असा करा उपयोग, नेहमी राहाल सुखी समाधानी

Chanakya Niti: पैशा शिवाय माणूस जगू शकत नाही. पैसा हि एक अशी वस्तू आहे, जी आज चांगल्या आणि वाईटाची ओळख करुण देते. चाणक्य नीतीनुसार जो पैशाचे मूल्य समजतो, तो समृद्ध आणि संपन्न राहतो. जो त्याची कदर करत नाही तो वरतून खाली जमिनीवर पडतो.

आचार्य चाणक्य यांच्या मते, संपत्तीची भरभराट तेच करतात जे संयमाने सुरक्षित ठेवतात. आचार्य चाणक्यांनी पैसे वापरण्याचे काही मार्ग सांगितले, जे त्यांचे पालन करतात ते संकटकाळात ही आनंदी राहता.

Chanakya Niti
Chanakya Niti: सुखी पैशांचा असा करा उपयोग, नेहमी राहाल सुखी समाधानी

सुरक्षितपणे वापरा

आचार्य चाणक्य म्हणतात सुरक्षितता, धर्मादाय आणि गुंतवणूक म्हणून पैशाचा वापर करणारी व्यक्ती संकटकाळात ही आनंदाने जगते. पैशाचा उपयोग चांगल्या जागेवर चागंल्या ठिकाणी केला पाहिजे. म्हणतात ना आपली जितकी चादर तेवढेच पाय पसरावे. विनाकारण पैसा खर्च करणार्‍यांना आपत्तींमध्ये दुःख आणि गरिबीला सामोरे जावे लागते.

Chanakya Niti: या गोष्टींमध्ये लपलेले आहे यशाचे रहस्य, कठीण पण होऊ शकते सोपे

विनाकारण खर्च करू नये

आचार्य चाणक्य मतांनुसार पैशाची बचत सर्वात मोठा चांगला सल्ला आहे. चाणक्य यांच्या मतांनुसार पैसा विनाकारण खर्च न करणे त्यावर आपले नियंत्रण ठेवणे. कधी कुठे किती पैसा कोणत्या ठिकाणी खर्च करायचा आहे त्यांचा हिसाब ठेवायचा जे माणसे असे करता लोक त्यांना कंजूस बोलतात. पण असे लोक वाईटहुन वाईट परिस्थिचे जीवन जगतात.

दान करा

आचार्य चाणक्य सांगतात कि, आपण कमावलेला जो हिस्सा आहे त्यामधून आपण थोडे दानपुण्य करायला हवे. दानपुण्य केल्याने आपली डबलने उन्नती होते. दान पेक्षा कोणते मोठे धन नाही, काही गरजू व्यक्तीला आपण जर मदत केली तर माता लक्ष्मीची आपल्यावर नेहमी कृपा राहील.

गरजा मर्यादित ठेवा

ज्या प्रमाणे संतुलित आहार आपल्या शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवते, तसेच पैसा आणि खर्च यांचा ताळमेळ माणसाला आपत्तीच्या काळातही दुखावत नाही. पैसे अत्यंत सावधपणे खर्च करा, यासाठी तुमच्या गरजा मर्यादित करणे आवश्यक आहे. जितकी गरज आहे तितकेच खर्च करा.

About Leena Jadhav