Chanakya Niti: राग करणे हे प्रत्येक माणसांच्या स्वभावात आहे. पण काही वेळेस न काही करता पण राग येतो. चुकीच्या वेळेस, चुकीच्या ठिकाणी आलेला राग पण आपले काम बिघडू शकते. रागामध्ये माणूस कोणती ही गोष्ट बोलत असतांना तो भानावर नसतो. तो रागाच्या भरात चांगले वाईट काहीही बोलून जातो. पण राग शांत झाल्यावर आपण बोललेल्या गोष्टींवर पश्चाताप करतो. अशा स्थितीत आचार्य चाणक्य यांच्या नीती सर्वोत्तम मार्गदर्शक ठरू शकतात.
चाणक्य यांच्या नीतीनुसार, काही लोकांशी कधीही भांडण करू नका,अन्यथा तुम्हाला भविष्यात अडचणीचा सामना करावा लागतो. बघू या कोणत्या लोकांशी राग करू नये

कुटुंबातील लोकांशी करू नये वाद:
चाणक्य नीतीनुसारआपण आपल्या कुटूंबातील लोकांसोबत कधी वाद नये. कुटुंब आपल्याला चांगल्या आणि वाईटाची ओळख करुण देते, त्यामुळे कुटुंबाच्या लोकांशी वाद करणे किंवा भांडणे म्हणजे आपल्या शुभचिंतकांना गमावण्यासारखे आहे. यामुळे तुम्हाला पश्चाताप होऊ शकते, त्यापेक्षा हि भविष्यात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारे कुटुंबीय ही दूर होऊ शकतात.
मूर्खां सोबत वाद करू नका:
आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार मुर्ख लोकांशी वाद कधी ही घालू नये. त्यांच्याशी भांडल्याने आपला वेळ वाया जातो. त्यांच्याशी वाद करणे म्हणजे म्हशी समोर पुंगी वाजवण्यासारखे आहे. मूर्ख लोक आपली गोष्ट पटवण्यासाठी तर्क हीन मुद्दे ठेवतात आणि वाद घालू लागतात, त्यांच्याशी वाद किंवा रागावून स्वतःलाच त्रास होऊ शकतो.
हे पण वाचा : चाणक्याच्या या गोष्टींचा करा विचार, देवी लक्ष्मीची सदैव राहील कृपा
मित्रांशी करू नका वाद:
मित्रांचे नाते जीवनात सर्वात महत्वाचे आहे, मस्करी मजाक मस्ती करण्यापासून सीक्रेट्स शेयर करे पर्यंत मित्र प्रत्येक पाऊलांवर साथ देतात. मित्रांशी जर आपण भांडण केले तर त्यांना आपण गमावून बसु यामुळे विश्वासाच्या नात्याचा अंत होऊन शकतो.
शिक्षकांशी नका करू नये वाद:
अध्यापकाची भूमिका सर्वांच्या आयुष्यात महत्वाची असते. एक चांगला शिक्षक आयुष्यात तुमचा मार्गदर्शक सिद्ध होऊ शकतो. मात्र, काही लोक रागाच्या भरात गुरूला वाईट बोलण्यासही काही वेळेस मागे पुढे पाहत नाहीत. असे केल्याने तुम्ही केवळ गुरू पासूनच नाही तर ज्ञानापासून ही अंतर राखता.