Breaking News

चाणक्य नीति: स्त्री मध्ये ह्या 6 सवयी असतील तर घर उध्वस्त होते, तुम्ही देखील माहिती करा त्या सवयी

आचार्य चाणक्य हे शिक्षक, तत्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, न्याय शास्त्रज्ञ आणि राजीकीय सल्लागार म्हणून लोकप्रिय आहेत. आचार्य चाणक्य पाटलीपुत्रांचे एक महान विद्वान होते. एवढ्या मोठ्या साम्राज्याचे मंत्री झाल्या नंतरही त्यांनी एका साध्या झोपडीत राहणे पसंत केले. तसेच, अत्यंत साधे जीवन जगण्यावर त्याचा विश्वास होता.

चाणक्य यांनी आपल्या आयुष्यातील काही अनुभव ‘चाणक्य नीति’ या पुस्तकात दिले आहेत. आचार्य चाणक्य यांच्या नीती ग्रंथ पुस्तकामध्ये मानवांसाठी असलेल्या अनेक नीतींचा उल्लेख आहे.

जर माणूस आपल्या आयुष्यात या नीतीचे पालन करतो तर त्याचे आयुष्य आनंदी होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति या पुस्तकात स्त्रियांच्या अशा काही सवयी नमूद केल्या आहेत, ज्या त्यांना नाशाच्या मार्गावर पोहचवतात. त्या सवयी काय आहेत, माहिती करू या

पैशाचा लोभ : चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, काही स्त्रिया पैशाच्या लोभाने विचार न करता काम करतात. या दुष्कर्मांमुळे ते नंतर अडचणींमध्ये येतात. अशा परिस्थितीत आपल्या मध्ये पैशाचा लोभ असेल तर ताबडतोब तो काढून टाका, अन्यथा यांच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

पुजा पाठ न करणे : प्रत्येक हिंदू घरात पूजा पाठ केले जाते. तथापि, अजूनही काही लोक उपासनेवर विश्वास ठेवत नाहीत. विशेषत: आजच्या महिलांना पूजा करण्यात रस नाही. आपण देखील त्यापैकी एक असाल तर ताबडतोब ही सवय बदला. ज्या घरात महिला उपासना करत नाहीत, त्या घरात नकारात्मक उर्जा वाढू लागते. एवढेच नव्हे तर घरातील आनंद आणि शांती हळूहळू संपते.

प्रत्येक गोष्टीत नखरे करणे : या जगात अशी कोणतीही स्त्री नाही जी नखरे करत नाही. परंतु सर्व गोष्टींत नखरे करणे योग्य नाही. म्हणून जर आपण देखील असे नखरे करत असाल तर असे अजिबात करू नका. कारण या सवयीमूळे समोरील व्यक्ती खूप दुखावू शकते आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील.

न विचार करता काम करणे :  बहुतेक स्त्रिया कोणतेही काम करण्यापूर्वी जास्त विचार करत नाहीत. आजच्या स्त्रिया इतक्या स्वार्थी झाल्या आहेत की, इतरांकडे दुर्लक्ष करून त्यांना जे पाहिजे आहे ते करतात. याचा कोणा वर कसा परिणाम होईल, त्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही. अशा परिस्थितीत त्यांना वाईट कामाचा परिणाम देखील सहन करावा लागतो. म्हणून, कोणती ही कामे करण्यापूर्वी विचार पूर्वक केला पाहिजे.

सारखे सारखे खोटे बोलणे :  काही स्त्रियांना खोटे बोलण्याची सवय असते. काहींना इकडचे तिकडे सांगण्यात आनंद मिळत असतो. अशा महिलांवर कोणी ही विश्वास ठेवत नाही. अशा स्त्रिया त्यांच्या वागण्यामुळे इतरांच्या दृष्टीत आपला आदर गमावतात. अशा वागण्याने स्त्रियांच पतन सुरू होते.

वडीलधाऱ्यांच्या आदर न करणे : ज्या स्त्रिया वडीलधाऱ्यांच्या आदर करीत नाहीत आणि त्यांच्याशी सारखे वाद विवाद करतात अशा स्त्रिया घराच्या सुख आणि शांतीसाठी मोठा धोका असतात. अशा स्त्रीशी लग्न केल्या वर माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही.

About Vishal V

नियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.