Breaking News

नात्यात बोलल्या गेलेल्या काही खोट्या गोष्टींमुळे तुमचे नाती अधिक दृढ होऊ शकतात!

नात्याचे दुसरे नाव सत्य आणि प्रामाणिकपणा आहे आणि अशा परिस्थितीत जर आपण असे म्हटले तर खोटे बोलणे आपले नाते मजबूत करते, तर आपल्याला असे वाटेल की आपण चुकीच्या सल्ल्या देत आहोत. परंतु आम्ही अशा खोट्या गोष्टी बद्दल बोलत आहोत ज्यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही उलट असे खोटे ऐकणाऱ्याला ते खूप आवडेल.

जर समजा तुमच्या पत्नीने तुम्हाला विचारले कि, मी पहिल्या पेक्षा जास्त जाडी झाली आहे का, जर ते भले खरे असेल, तिचे वजन पहिल्या पेक्षा वाढले असेल तरी तिला मुळीच नाही म्हणून असे सांगा. तू जाडी नाही तर हेल्दी झाली आहे आणि पहिल्या पेक्षा जास्त सुंदर दिसू लागली आहे.

ह्याच प्रमाणे जर पत्नीने विचारले कि, हा रंग माझ्या वर कसा दिसत आहे, तर तुम्ही थोडा विचार करा तिला थेट चांगला दिसत नाही म्हणून बोलण्या पेक्षा तिला तुम्ही असे सांगू शकता कि तू हा रंग वापरला तर तू अजून सुंदर दिसू शकते बाकी तुझी इच्छा बस्स ऐवढ बोला बघा ती तुमचं बोलणं नक्की हसत हसत ऐकेल.

बायकांना मोबाईल वर बोलताना जोर जोरात बोलायची सवय असते. तुमची पत्नी हि जोरात बोलत असेल तर तिला हळू बोल हळू बोल असे सांगण्या पेक्षा तिला असे सांगा कि, जेव्हा तू मोबाईल वर हळू आवाजत बोलते तेव्हा तुझा आवाज खूप गोड आणि सेक्सी वाटतो, मग बघा पुढच्या वेळी पासून ती स्वतःहून हळू आवाजात बोलले.

तुमच्या पतीने जर एखादा पदार्थ बनवला आणि तुम्हाला त्याची चव आवडली नाही तर त्याला नावे ठेवण्या ऐवजी त्याने घेतलेली मेहनत आणि तुमच्या वरील प्रेमासाठी असे सांगा कि तू घेतलेली मेहनत नक्कीच स्तुती करण्या सारखी आहे. पुढच्या वेळी ह्या पदार्थामध्ये थोडा हा मसाला ट्राय केला तर टेस्ट काही वेगळी होईल. असे केल्याने तुमच्या दोघं मधील प्रेम अजून वाढेल.

जर तुमच्या पतीने कोणत्या कामात हस्तक्षेप करणे तुम्हाला आवडले नाही तर त्याला तुला येत नाही तर करू नको असे बोलण्या पेक्षा तुम्ही त्याला प्रेमाने असे सांगा कि तू पहिलेच किती मदत केली आहे. तू आता मला हे काम करू दे आणि तू ते काम जे तू माझ्या पेक्षा जास्त चांगले करतो आणि मी हे करते. किंवा तुम्ही असे हि बोलू शकता कि तू थकला अशील तू आराम कर मी हे करून घेते.

काही वेळेस पती पत्नीने एकमेकांची खोटी खोटी स्तुती केली पाहिजे हयामुळे दोघांना हि चांगले वाटले आणि तुमच्या मधील प्रेम हि वाढेल. बाकी घरातील मंडळी सोबत देखील काही वेळेस असे खोटे बोलणे चांगले आहे. ह्यामुळे आप सातील प्रेम वाढेल आणि कुटुंब देखील आनंदी राहील.

जर पत्नी असे वाटत असेल कि, पती आणि माहेरच्या लोकांचे पटत नाही तर पतीच्या समोर सांगा कि माझ्या घरातली लोक तुमची खूप स्तुती करत होते, बोलत होते कि जावई खूपच चांगले आहेत, मुलीला सुखी आणि आनंदी ठेवतात, तिचे सर्व लाड करत. आमचा देखील किती आदर करतो आमच्या मुलं सारखा आहे. अशी स्तुती केल्याने पतीदेव नक्कीच खुश होतील आणि तुमच्या घरातील लोकांवर प्रेम करतील आणि त्यांचा पहिल्या पेक्षा जास्त आदर करतील.

तसेच पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांना देखील आपल्या सासरच्या लोकां बद्दल तक्रार न करता, आपले सासरचे लोक माहेरचे असे कौतुक करत त्या बद्दल बोलावे. सासरचे लोक नेहमी आई वडिलांनी चांगली शिकवण आणि संस्कार दिली आहे ह्या बद्दल तुमचे कौतुक करता असे सांगू शकता. त्यामुळे माहेरच्या लोकांच्या मनात सासरच्या बद्दल प्रेम, आदर आणि आपलेपणा वाढेल.

ह्या शिवाय एक गोष्ट लक्षात ठेवा कि, आपल्या जोडीदारा सोबात आपले विशेष सिक्रेट म्हणजे तुमचे लग्ना पूर्वीचे अफेयर, एखादी कल्पनारम्य गोष्ट फँटसि लग्नाच्या सुरुवातीच्या काळात कधी हि सांगू नका. भले तुमचा जोडीदार ते किती हि लाडात, प्रेमाने किंवा कोणते हि आमिष देत असेल तरी सांगू नका. लग्नाच्या काही काळ नंतर देखील ह्या गोष्टी सांगू नका तुमचा एकमेकांवर विश्वास बसला तरी. कारण ह्या बाबतीत तुम्ही खोटे बोलणेच तुमच्या नात्याच्या फायद्याचे राहील.

About Vishal Patil