Breaking News

होईल लक्ष्मी माते कृपा आणि मिळेल धन संपत्ती, आपल्या घरात फक्त ह्या 7 गोष्टींची ठेवा काळजी

खूप जुनी एक म्हण आहे कि, “पैसे झाडावर लागत नाही”. जेव्हा कधी कोणी फालतू खर्च करण्याबाबत आपल्याला पैसे मागतात किंवा आपण कोणाला पैसे मोगतो तेव्हा हि म्हण बोलली जाते. श्रीमंत असो व गरीब सर्वच लोक आपले पैसे सांभाळून ठेवत असतात, पैसे कसे आणि कुठून वाचवता येतील प्रयत्न करत असतात.

परंतु आपणास माहित आहे की घरात पैसे राहावे त्यासाठी खर्च कमी करणे आणि पैसे साठवणे पुरेसे नाही. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे घरात नकारात्मक प्रभाव निर्माण होतो आणि पैसे घरात वाढायच्या ऐवजी खर्च होतात. आपल्या लक्षात येत नाही कि आपण प्रयत्न केले तरी आपली आर्थिक स्थिती का सुधारत नाही. चला तर पाहूया घरी पैसे न राहण्याची वास्तुशास्त्रानुसार काय कारणे आहेत.

१) बंद पडलेले घड्याळ: काही घरात अशा सामानाला खूप जपून ठेवले असते, ज्यांचा काहीच उपयोग नाही तरी ते सामान जमा करून ठेवतात. त्यामध्ये बंद पडलेले घड्याळे आहेत. घरात कधी ही तुटलेली किंवा खराब झालेली घड्याळे ठेवू नये. असा विश्वास आहे की अशी घड्याळे ठेवल्याने घराचे पैसे वाया जातात आणि घराच्या सदस्यांची वाईट वेळ कधीच संपत नाही, त्यांची प्रगती थांबून जाते. सतत अपयश येते.

२) गळणारे किंवा वाहणारा नळ: वास्तुशास्त्रानुसार गळणारे नळ अशुभ मानली जाते. असे म्हणतात की ज्या प्रकारे नळातून हळू हळू पाणी बाहेर पडते तसेच हळू हळू घरातील सर्व धन पैसे फालतू गोष्टींमध्ये खर्च होतो. पैसे विनाकारण खर्च होतात. घरात जर असे गळणारे नळ असतील तर लगेच दुरुस्त करा.

३) भिंतींमध्ये तडे : जर तुमच्या घराच्या भिंतींमध्ये क्रॅक तडे असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करा. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की भिंतींमध्ये पडलेल्या तड्यांमुळे घरातील सदस्यांच्या आजाराच्या उपचारांसाठी सर्व पैसे खर्च होतो. अशा भिंती घरात नकारात्मकता निर्माण करत, तसेच गरिबीचे कारण बनतात.

४) आवाज करणारे दरवाजे: घराचे दरवाजे उघडताना किंवा बंद करताना आपण आवाज करत असल्यास, वास्तुशास्त्रात ते चांगले मानले जात नाही. असे म्हणतात की जर घराचे दरवाजे आवाज करत असतील तर घरातले सर्व पैसे घराच्या समस्या सोडवण्यासाठी खर्च होतात. तसेच, घरात सतत नकारात्मकता असते. अशा दरवाजांची दुरुस्ती करावी.

५) तुटलेली वस्तू फेकून द्या: तुटलेल्या वस्तू घरातून काढून टाकाव्यात. अशा वस्तू घरात ठेवल्यामुळे कधीही घरातून दारिद्र्य जात नाही. तसेच समृद्धीचा लक्ष्मीचा रस्तादेखील थांबतो. घरातील तुटलेली भांडी, बादली, खेळणी व फोन इत्यादी वस्तू घरातून काढून टाकल्या पाहिजेत. अशा गोष्टी लक्ष्मीला घरात राहू देत नाहीत.

६) कचरा पूर्व उत्तर दिशेने काढा: घराच्या पूर्व उत्तर दिशेला कधीही कचरा ठेवू नका, ही जागा पूजेसाठी आहे. हे सर्व दिशा सर्वात पवित्र मानली जाते. त्यामुळे येथे कचरा ठेवणे चांगले मानले जात नाही. ही जागा घरातल्या मंदिरासाठी आहे.

७) पूजेच्या जुन्या वस्तू काढून टाका: घरातील मंदिरात पूजा करताना मूर्तींना फुले व हार अर्पण करतो. मंदिराची वेळोवेळी साफसफाई करुन जुन्या फुलांचे हार काढून मंदिर स्वच्छ करावे. वास्तुशास्त्रानुसार मंदिरात जुन्या पूजेच्या वस्तू ठेवल्यामुळे घरात दोष आढळतात. यामुळे घरात दारिद्र्य, त्रास आणि क्लेश निर्माण होतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.