Chanakya Niti: यश मिळवण्यासाठी माणसाला आपल्या जीवनात कठोर मेहनत करावी लागते, पण यश भेटल्या नंतर शत्रू आटोमॅटिक तयार होतात. यश मिळाल्या नंतर तुमच्या सोबत काही असे घडत असेल तर चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी वर अंमल करायला पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्यामते यश मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच शत्रूंना पराभूत करण्याची पद्धत ही वेळीच आत्मसात करणे आवश्यक आहे.

चाणक्य नीती नुसार माणसाला कधीही आपल्या शत्रूला हलक्या मध्ये घेतले नाही पाहिजे, नाहीतर तुमचा शत्रू तुमचे नुकसान करू शकतो. आता बघू या आचार्य चाणक्य यांच्या कोणत्या गोष्टी वर अंमल करून शत्रूंवर सहज पणे मात करू शकता.
आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टींवर करा अंमल
१. चाणक्य नीती नुसार माणसाने प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक विचार ठेवले पाहिजे. शत्रू समोर जर आपलेला आपली हार दिसत आहे तरी आपण धैर्य विसरायला नाही पाहिजे.
२. आचार्य चाणक्याच्या मते माणसाला आपल्या रागावर नेहमी नियंत्रण ठेवता आले पाहिजे. रागात कधी-कधी व्यक्ती त्याचा विवेक गमावतो, रागात माणूस असे निणर्य घेतो जे त्याच्यासाठी योग्य नसतात.
३. चुकीचा निर्णय घेतल्यावर शत्रूला संधी मिळते. यासाठी प्रत्येक गोष्ट थंड डोक्याने विचार करून समजून घ्या आणि मग काही कृती करा.
४. चाणक्य नीतीनुसार शत्रूला कधीही कमजोर समजू नये. तो जर तुमच्या पेक्षा कमजोर असला, तरी पण चांगल्या प्रकारे त्याच्या शक्तीचे आकलन करा.
५. जर शत्रु तुमच्या पेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर त्याच्या अनुकूल चालले पाहिजे. त्याला कोणत्याही प्रकारे संधी देऊ नका. अशा शक्तिशाली शत्रू वर योग्य संधी बघून चाल केली पाहिजे.