Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही खऱ्या आहेत. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्र यशा बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहे.
चाणक्य नीती मध्ये सांगितले आहे कि, माणसाला यश मिळवण्यासाठी कोणते काम केले पाहिजे आणि कोणत्या कामा पासून दूर राहिले पाहिजे. काही वेळेस किती ही कष्ट केल्यावर आपल्या हातात अपयश येते, चुका या माणसाच्या मार्गात अडथळा ठरतात आणि त्याचे नुकसान त्याला आयुष्यभर सहन करावे लागते.

या चुका करण्यापासून वाचले पाहिजे:
१. आचार्य चाणक्यांनी नीतीनुसार जो व्यक्ती आपल्या जवळ अस्तित्वात असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तो इतर गोष्टींच्या मागे धावतो, तो कोणत्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही.
२. असा माणूस हातात आलेल्या यशाचा आनंद पण घेऊ शकत नाही. त्यामुळे लोभ करण्यापासून दूर रहा.
३. जो माणूस सत्याची साथ सोडून असत्याची साथ देतो किंवा नैतिक काम सोडून अनैतिक काम करतो, त्यांना यश मिळण्याची शक्यता कमी असते.
Chanakya Niti: महिला आणि पुरुषांनी या गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात
४. असे लोक यशा जवळ जातात तरी देखील दूर राहून जातात. त्याशिवाय लोभी व्यक्ती देखील यशाचा आनंद घेऊ शकत नाही, त्याच्या पासून देखील यश दूरच राहते.
५. आचार्य चाणक्य म्हणतात लोक विचार न करता, नियोजन नकरता काम करता, कठोर परिश्रम आणि चांगल्या हेतू नंतर ही ते मागे पडतात.
६. ध्येय मोठे असो वा लहान नेहमी रणनीती नियोजन बनवूनच काम करा. असे केल्याने यश निश्चित मिळते.
७. आचार्य चाणक्य म्हणतात कि, माणूस आपल्या मनात अहम भाव ठेवतो तो नेहमी यशाने वाहून जातो. आपल्या अहंकारावर मात करणे हे सर्वात मोठे यश आहे.