Breaking News

दिवाळीच्या रात्री आपल्या राशीनुसार करा अशा प्रकारे करा मंत्र जप, घरी येईल धनलक्ष्मी

दिवाळीला देवी लक्ष्मीच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की व्यक्तीने एकदा लक्ष्मीला प्रसन्न केले कि, पुन्हा आयुष्यात तिच्याकडे पैशाचा अभाव राहत नाही. ह्यासाठी आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार काही विशेष मंत्र सांगणार आहोत. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळी जप केल्याने तुम्हाला धन लाभ होईल.

या मंत्रांचा जप करण्याची एक विशेष पद्धत  आहे. दिवाळीच्या रात्री 12 नंतरच तुम्ही या मंत्रांचे पठण करावे. जप सुरू करण्यापूर्वी आपला चेहरा पूर्वे कडील दिशेने करा आणि तेथे गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा. हे लक्षात ठेवा की आपला मंत्र जप होई पर्यंत तो दिवा जळत चालू राहावा.

कुश (गवताचा एक प्रकार) च्या आसनावर बसून या मंत्राचा जप करावा. आपल्याला कमीत कमी 11 माळ मंत्र जप करावा लागेल. मंत्र जप करण्यासाठी आपण स्फटिक मणीची माळ देखील वापरू शकता. मंत्राचा जप संपल्या नंतर पूजेच्या ठिकाणीत जप करण्याची माळ ठेवावी आणि त्या माळीला पुष्प अर्पण करून तेथेच ठेवावी.

आता आपण पाहू या, राशी नुसार कोणता मंत्र जप करायचा आहे :

मेष : या राशीच्या लोकांनी ‘ओम ऐं क्लीं सौ:’ हा मंत्र जपला पाहिजे.

वृषभ : या राशीच्या लोकांनी  ‘ओम ऐं क्लीं श्रीं’ मंत्र जप करावा.

मिथुन : या राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी ‘ओम क्ली ऐं सौ:’ हा जप करावा.

कर्क : या राशी असणाऱ्या लोकांनी ‘ओम ऐं क्ली श्रीं’ हा मंत्र जप करावा.

सिंह : या राशीचे लोक ‘ओम ह्रीं श्रीं सौ:’ हा मंत्र जप करा.

कन्या: राशींच्या लोकांनी ‘ओम श्रीं ऐं सौ:’ या मंत्राचा जप करावा.

तुला: राशीवाल्यानी ‘ओम ह्रीं श्रीं सौं’ जप कारवा, आई लक्ष्मीला प्रसन्न करू शकता.

वृश्चिक : दिवाळीच्या रात्री ह्या राशीवाल्यानी ‘ओम ऐं क्लीं सौ:’ या मंत्राचा जप करावा.

धनु: या राशीच्या लोकांनी दिवाळीच्या रात्री ‘ओम ह्रीं क्लीं सौ:’ हा जप करा.

मकर: तुम्ही लोक ‘ओम ह्रीं क्लीं ह्रीं श्रीं सौ:’ हा जप करावा .

कुंभ: या राशीच्या लोकांसाठी ‘ओम ह्रीं ऐं क्लीं श्रीं’ हा मंत्र जप करणे फायद्याचे ठरेल.

मीन: दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण ‘ओम ह्रीं क्लीं सौ:’ चा जप करावा.

आम्हाला आशा आहे की या मंत्रांचा जप केल्यास आई लक्ष्मी आपल्या घरी नक्कीच येईल. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About Vishal V

नियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.