Breaking News

काल भैरव जयंतीच्या दिवशी करा हे 5 उपाय, होईल प्रत्येक मनोकामना पूर्ण, राहील कृपा भैरवाची

हिंदू धर्मात काळ भैरव यांच्या पूजेस विशेष महत्त्व दिले जाते. काल भैरव हे भगवान शिवचे रूप मानले जातात. तुम्हाला सांगतो की काल भैरव जयंती 7 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्णपक्षातील आठव्या दिवशी काल भैरव देव यांची जयंती साजरी केली जाते. हे कलाष्टमीच्या नावाने देखील ओळखले जाते.

हिंदू शास्त्रा नुसार भगवान काल भैरव यांचा जन्म मार्गशीर्ष कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला होता. काल भैरव जयंतीच्या दिवशी काल भैरव यांची विधीवत पूजा केली जाते, असे म्हणतात की या दिवशी भगवान काल भैरव यांची उपासना केल्यास त्यांची कृपा कायम राहते. याशिवाय जर आपण या दिवशी काही सोपे उपाय केले तर ते आपल्या जीवनातील अडचणी कमी होतील आणि आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील.

तर मग जाणून माहिती करू या काल भैरव जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करावे

40 दिवस सतत भेट काळ भैरवाचे दर्शन करावे : जर तुम्हाला भगवान भैरवाना प्रसन्न करायचे असेल आणि त्यांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर काल भैरव जयंतीच्या दिवसा पासून 40 दिवस तुम्ही सतत काळ भैरवाचे दर्शन केले पाहिजे. हा उपाय केल्याने मनोकामना पूर्ण होतात. जर आपण हा उपाय योग्य प्रकारे केला तर आपल्याला लवकरच त्याचा फायदा मिळेल.

मोहरीच्या तेलाचा दिवा लावा : तुम्हाला काल भैरव जयंतीच्या दिवशी भगवान काळ भैरवाला प्रसन्न करायचे असेल तर यासाठी भगवान काळ भैरवच्या मूर्ती समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि श्रीकाळ भैरवाष्टकम् चे पठण करा. असे मानले जाते की याद्वारे व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज भक्तीने करा. तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल.

भगवान शिवची पूजा केल्यास काळ भैरव आशीर्वाद देतील : धर्म ग्रंथानुसार भगवान भैरव यांचा जन्म भगवान शिवचा भाग म्हणून झाला होता. जर तुम्ही काळ भैरव जयंतीच्या दिवशी देवांचे देव महादेव यांची उपासना केली तर ते भगवान काळ भैरवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. काल भैरव जयंतीच्या दिवशी 21 बेलाच्या पाना वर चंदनने ओम नमः शिवाय लिहून सर्व बेलाची पाने शिव लिंगा वर अर्पण करा. जर आपण या पद्धतीने पूजा केली तर भगवान भैरव तुमच्या वर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतील.

काळ भैरवाच्या मंदिरात जाऊन ह्या गोष्टी अर्पण करा : काल भैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही काळ भैरवाच्या मंदिरात जाऊन सिंदूर, मोहरीचे तेल, नारळ, हरभरा, चारोळी, गव्हाची गोड पुरी आणि जलेबी ह्या गोष्टी अर्पण कराव्यात. भगवान काळ भैरव यांची भक्ती भावाने पूजा करा आणि ही सर्व सामग्री अर्पित करा.

काळ्या कुत्र्याला गोड भाकरी द्या : जर तुम्हाला काळ भैरव जयंतीच्या दिवशी भगवान काळ भैरवाला प्रसन्न करायचे असेल तर आपण यासाठी कोणत्याही काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ द्या. जर तुम्हाला काळा कुत्रा सापडला नाही तर अशा स्थितीत तुम्ही कोणत्याही कुत्र्यास गोड भाकर द्या. जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला भगवान काळ भैरव तसेच न्याय देवता शनी देव यांचे आशीर्वाद देखील मिळतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About Vishal V

नियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.