Breaking News

या 6 गोष्टी मकर संक्रांती वर दान करा, जीवन सुखी होईल, पैशाची कमतरता भासणार नाही

मकर संक्रांतीचा सण जानेवारी महिन्यात दरवर्षी 14 किंवा 15 तारखेला येतो. यंदा मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. आपणस सांगू की ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य या दिवशी मकर राशीत येतो अर्थातच राशी चक्रातील “मकर” चे स्वागत करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.

मकर संक्रांती हा हिंदूंचा एक मुख्य सण मानला जातो. मकर संक्रांतीचा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी गंगा सारख्या पवित्र नद्यां मध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. मकर संक्रांतीचा सण देश भरात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.

धार्मिक शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदी किंवा जल कुंडा मध्ये स्नान, दान पुण्य केले जाते. शास्त्रात असे नमूद केले आहे की जर एखाद्या व्यक्तीने मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू दान केल्या तर त्याचे दुप्पट फळ प्राप्त होते. आज आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला सांगणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्यात.

कदाचित आपणास हे माहिती असेल की मकर संक्रांतीला खिचडीचा सण देखील म्हटले जाते. या दिवशी तांदळाची खिचडी प्रसाद म्हणून वाटण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की जर मकर संक्रांतीला माणसाने खिचडी दान केली तर आयुष्य सुख शांततेत व्यतीत होते. जीवनाचे सर्व त्रास दूर होतात. खिचडी दान केल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद व शांती हवी असेल तर मकरसंक्रांती वर खिचडी दान करा.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत असेल तर त्या व्यक्तीने मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ व तीळ दान करावे. धर्म ग्रंथानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी जर गुळ व तिळाचे दान केले असेल तर, कुंडलीत सूर्याची स्थिती अधिक बळकट होते, एवढेच नव्हे तर शनि ही मजबूत होतो. सूर्य देवाच्या कृपेने, एखाद्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो आणि सर्व कामांमध्ये यश मिळते.

मानवी जीवनात सुखा सोबतच दुःख देखील येते. परंतु जे लोक त्यांच्या त्रासातून मुक्त होऊ शकत नाहीत. ज्यांचा वाईट काळ संपण्याचे नाव नाही, मग त्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी मीठ दान करावे. असे केल्याने लवकरच वाईट काळ दूर होईल.

मकर संक्रांतीला तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. मकर संक्रांतीला तिळाचे दान करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरते ज्यांना शनीची साडेसाती चालू असते. आपण एखाद्या गरीब व्यक्तीला तांब्याच्या भांड्यात काळ्या तिळाचे दान केल्यास जीवनातील शनि दोष त्रास दूर होईल. हे उपाय केल्यास नोकरी व्यवसायात यश प्राप्त होते.

मकर सक्रांतीवर तुम्ही गरीब, असहाय व गरजू लोकांना धान्य दान करा. जर हा उपाय केला तर ती आई अन्नपूर्णा विशेष आशीर्वाद देते आणि आपल्या जीवनात  कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता राहत नाही.

तुमच्या आयुष्यात जर आर्थिक समस्या चालू असतील तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी तूप दान द्यावे. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात पैशाशी संबंधित समस्या लवकरच सोडवल्या जातात.

About Vishal V

नियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.