जेव्हा महाभारतच्या युद्धात श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने पांडव आपल्या संपूर्ण कुटुंबा समवेत हस्तिनापूरला परत आले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महाराज धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. पण परत आल्यामुळे कौरव खूश नव्हते. पांडवांना ठार मारण्यासाठी कौरवांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते पण ते यशस्वी झाले नाहीत. पांडव आणि कौरवांपैकी सर्वात ज्येष्ठ व कुशल असल्याने आणि लोकांची मागणी पाहून युधिष्ठिर राजा झाला.

ज्या दिवशी युधिष्ठरचे राजटिळक केले, त्याच दिवशी श्रीकृष्ण आशीर्वाद देण्यासाठी देखील पोहचले. राजटिळकाच्या रात्री युधिष्ठिर व श्रीकृष्ण राज्यात सुख आणि शांती कशी स्थापित करावी या चर्चेत श्रीकृष्णाने युधिष्ठिरला अशा पाच गोष्टी सांगितल्या ज्या घरात असने खूप शुभ असते. या पाच गोष्टी घरात असल्याने नेहमीच धन, संपत्ती, आनंद आणि समृद्धी राहते. तर मग त्या पाच वस्तूंची नावे व त्यांच्या विषयी तपशील जाणू या

पाणी : सर्वात पहिले बोलायचं झाले तर ती पहिली वस्तू आहे पाणी, होय पाणी. पाणी संपत्तीच्या हालचालीवर नियंत्रण ठेवते आणि असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्ध्य म्हणून द्यावे. देवासाठी पितळ किंवा चांदीच्या भांड्यात पाणी भरून देवघरात ठेवले पाहिजे. तसेच घरात आलेल्या कोणालाही पाणी द्यावे, मग तो पाहुणा असो की कोणी आपल्या घरात काम करणारी व्यक्ती. असे केल्याने नेहमीच पैसे तुमच्या घरात राहतील आणि पैसेही वाढतील.

चंदन : श्री कृष्णाने दुसरी गोष्ट चंदनाची सांगितली, प्रत्येक घरात चंदनाचे लाकूड असावे, ही गोष्ट शुभ मानली जाते. कृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की चंदनच्या झाडाला साप ज्या प्रकारे चिकटतो, पण झाड विषारी बनत नाही, त्याच प्रकारे घरात नकारात्मक उर्जा असली तरी त्याचा आपल्या घरावर परिणाम होत नाही. रोज घरात चंदन देवाच्या फोटोवर लावा आणि मग आपल्या कपाळावर लावल्याने आपल्या घरात पैशाची कमतरता कधीच येत नाही.

तूप :  श्रीकृष्णाने सांगितले की प्रत्येक घरात गायीचे तूप असणे खूप शुभ आहे. यामुळे घरात कधीही खाद्यपदार्थांची कमतरता भासत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गायीचे तूप जर घरी बनवले गेले असेल तर तुम्ही रोज गायीच्या तूपाने दीप लावून देवाची उपासना करू शकता. असे केल्याने जीवनातले त्रास आणि अडथळे नष्ट होतात. आपण तूप सेवन केले पाहिजे आणि तुपाचा वापर हवन करण्यात केल्यास घरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

वीणा : वीणा हे माता सरस्वती यांचे प्रतीक असल्याचे मानले जाते, आई सरस्वती ही ज्ञान आणि बुद्धीची देवी आहे. श्री कृष्णाने सांगितले की ज्याप्रमाणे माता सरस्वती कमळाच्या फुलावर बसली आहे आणि जसे कमळाचे फूल चिखलात वाढते परंतु चिखल फुलाला स्पर्श करू शकत नाही त्याच प्रकारे, देवी सरस्वतीची वीणा घरात ठेवल्याने गरीबी, दरिद्रीपणा, अपशकुन, आणि अज्ञान दूर होते. आपल्या क्षमतेनुसार आपण आपल्या घरात एक मोठी किंवा छोटी वीणा ठेवली पाहिजे. सजावटीच्या स्वरूपात देखील सुंदर वीणा ठेवू शकतो.

मध : श्री कृष्णाच्या मते, मध एक शुद्ध पदार्थ आहे ज्यामुळे घरात राहणारी नकारात्मक उर्जा दूर होते आणि घरातील वातावरण शुद्ध होते. मधाचे सेवन केल्याने मनुष्याचे शरीर आणि आत्मा देखील शुद्ध होते. घरातील प्रत्येक सदस्याने दररोज मध खावे, असे केल्याने तुमच्याकडे पैशाची कमतरता भासत नाही.

भगवान श्रीकृष्णाने सांगितल्या प्रमाणे मनुष्याने जीवनात ईश्वरावर विश्वास ठेवून कर्म करत राहावे म्हणजे आपल्याला त्याचे नक्कीच चांगले फळ मिळतले. कर्म करताना फळाची अपेक्षा न करताना आपले कर्तव्य आणि आपली जबाबदारी म्हणून करावे. जर आपल्याला यश आले तरी त्याचे श्रेय ईश्वराला दिल्यामुळे अहंकार येत नाही आणि असा मनुष्य अधिक सुखी होते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.