Breaking News

23 ऑक्टोबर ला सकाळी शुक्र कन्या राशी मध्ये प्रवेश करणार, काही राशींना धन लाभ तर काही राशींना अडचण

ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र हा एक शुभ ग्रह मानला जातो. शुक्राच्या प्रभावामुळे एखाद्याला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक आनंद मिळतो. म्हणून ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुख, वैवाहिक आनंद, भोग विलास, प्रसिद्धी, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय, लैंगिकता आणि फॅशन डिझायनिंग इत्यादी घटकांचा कारक मानला जातो. शुक्र वृषभ व तुला राशिचा स्वामी आहे आणि मीन उच्च राशी आहे, तर कन्या ही शुक्राची नीच राशी आहे.

अशाप्रकारे, शुक्र, 23 ऑक्टोबर 2020 रोजी शुक्र ग्रह सकाळी 10.34 वाजता आपल्या नीच राशी कन्या मध्ये प्रवेश करेल आणि सुमारे 25 दिवस या राशीत राहील. यानंतर, तो पुन्हा आपल्या स्वतःच्या राशीमध्ये जाईल, 17 नोव्हेंबर 2020 रोजी मंगळवारी दुपारी 12.50 वाजता कन्या राशी सोडेल. अशा मध्ये शुक्र कन्या राशी मध्ये प्रवेश करत असल्याने सर्वच 12 राशींवर त्याचे चांगले वाईट परिणाम होणार आहे. तुमच्या राशीसाठी त्याचे काय परिणाम होणार आहे ते पुढे वाचा.

मेष : शुक्र आपल्या राशीच्या सहाव्या घरात संक्रमण करणार आहे. ह्या काळात आपल्याला विरोधक आणि कोर्ट कचेरी, वाद विवादाचा सामना करावा लागू शकतो. कार्यक्षेत्रात शत्रूंची संख्या वाढणार आहे, परंतु तुम्ही तुमच्या चांगल्या प्रदर्शन करण्यावर भर लक्ष द्या. आता नोकरी बदली करण्यास योग्य वेळ नाही. आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवा त्यामुळे तुमची आर्थिक स्तिथी सुधारू शकते. कौटुंबिक जीवनात आई वडील ह्यांचे समर्थन आणि सहकार्य राहील.

वृषभ : शुक्र आपल्या राशीच्या पाचव्या घरात संक्रमण करत आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आणि तुम्ही खूप उत्साही असाल, तुमचा आत्मविश्वास उत्तम राहील. ह्या दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये चांगले यश मिळेल आणि नवीन संधी प्राप्त होतील. मुलांकडून तुम्हाला शुभ समाचार ऐकण्यास मिळेल, ज्यामुळे तुमचे जीवन आनंदी होईल. जर तुम्ही परिवार वृद्धीसाठी प्रयत्न करत असाल तर हा काळ उत्तम आहे.

मिथुन : शुक्र आपल्या राशीच्या चौथ्या घरात संक्रमण करत आहे. आपल्या आईला सुख प्राप्त होईल आणि आपल्या संपत्तीमध्ये वृद्धी होईल. समाज कार्यात काम केल्यामुळे तुमची प्रसिद्धी वाढणार आहे. कार्यक्षेत्रात तुमचे वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर खुश राहतील, सोबत आपल्या पगारात वाढ होण्याचे योग बनत आहे. आपली कोणतेही काम समजण्याची आणि विचार करून काम करण्याची शक्ती वाढणार आहे. तुम्ही प्रत्येक कार्य यशस्वी करू शकता.

कर्क : शुक्र आपल्या राशीच्या तिसऱ्या घरात संक्रमण करत आहे. ह्या काळात आपले छोटे भाऊ बहीण आपल्या कौटुंबिक व्यापारात सहयोग करतील आणि आपल्या परिक्रमात वृद्धी होईल. आपण आपल्या जीवनात उत्साही राहाल. आपल्या भविष्याच्या प्रगतीसाठी केले गेलेले प्रयत्न उत्तम परिणाम देणार आहेत. कुटुंब परिवार सोबत आनंद प्राप्ती होईल परंतु आपल्या आईच्या आरोग्याची काळजी ठेवा.

सिंह : शुक्र आपल्या राशीच्या दुसऱ्या घरात संक्रमण करत आहे. आपल्या राशीसाठी हा काळ शुभ फळ देणारा आहे. पारिवारिक व्यापार वृद्धी होण्याचे संकेत आहेत. आपल्याला उत्तम  होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत आपल्या माहीत होतील. पारिवारिक आणि वैवाहिक जीवन चांगले व्यतीत होईल.

कन्या : शुक्र आपल्या राशीच्या लग्न भावात अर्थात पहिल्या स्थानात संक्रमण करणार आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रात खूप सकारात्मक विचार कराल आणि खूप आशावादी राहाल. इतर लोक आपल्या कार्याने प्रभावित आणि आकर्षित होइल. आपले नाते संबंध अधिक मजबूत होतील. जास्त इच्छावादी होऊ नका अन्यथा आपण आपल्या लक्ष्या पासून भटकू शकता. आपल्या वडिलांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील.

तुला : शुक्र आपल्या राशीच्या बाराव्या घरात संक्रमण करत आहे. ह्या काळात आपली विदेश यात्रा करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते, सोबतच विदेशी स्रोतांकडून चांगला व्यापार होईल. आपण आपल्या योग्यतेनुसार नवीन कार्य करावे अन्यथा चांगली संधी निघून जाईल. भौतिक सुखाची वृद्धी होईल आणि कर्जाची समस्या समाप्त होईल. वैवाहिक जीवनात काही मतभेद होऊ शकतात.

वृश्चिक : शुक्र आपल्या राशीच्या अकराव्या घरात संक्रमण करत आहे. आपल्या राशीसाठी हा काळ उत्पन्नात वाढ करणारा असेल. आपल्या धन संबंधित समस्यांचा अंत होईल. कार्यक्षेत्रात अनुकूल परिणाम प्राप्त होईल आणि मित्रांसोबत चांगला वेळ व्यतीत होईल. त्यांच्या मदतीने जबाबदारी पूर्ण होईल. विदेश जाण्याची संधी प्राप्त होईल. आपला मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी नवीन विचार करावा.

धनु : शुक्र आपल्या राशीच्या दहाव्या घरात संक्रमण करत आहे. ह्या काळात आपल्या वडिलांचा मान वाढेल. राजनैतिक लोकांचे क्षेत्र वाढेल. आपल्या कार्यक्षेत्रात लक्ष पूर्वक काम करा अन्यथा आपले शत्रू सक्रिय होतील आणि आपल्यास हानी करू शकतात. आपल्या मनात नकारात्मक विचार जास्त राहतील ज्यामुळे नोकरी सोडण्याचा विचार करू शकता. परंतु नोकरी सोडण्याची हि योग्य वेळ नाही.

मकर : शुक्र आपल्या राशीच्या नवव्या घरात संक्रमण करत आहे. ह्या काळात व्यापाररिक यात्रा केल्याने चांगला लाभ प्राप्त होईल. वडिलांसोबत नाते अजून चांगले होईल. आपले भाग्य आपले समर्थन करेल, ज्यामुळे आपले सर्व कार्य यशस्वी होईल. ह्या काळात आपण धार्मिक यात्रा करू शकता. आपल्यास मानसिक शांती मिळेल. लव्ह लाईफ साठी हा काळ उत्तम आहे. मुलांच्या कार्यक्षेत्रात प्रगती झाल्याने मन प्रसन्न होईल.

कुंभ : शुक्र आपल्या राशीच्या आठव्या घरात संक्रमण करत आहे. ह्या काळात आपल्या जीवनात अनेक चढ उतार येऊ शकतात. कुटुंबा सोबतच आपण आपल्या आरोग्याची देखील काळजी ठेवा. कोणत्याही प्रकारचे कार्य करण्यास संकोच करू नका. कार्यक्षेत्रात आपल्याला चांगले वाटेल. आपले अधिकारी आणि सहकारी आपल्या कार्यात सहयोग आणि कौतुक करतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील परंतु आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.

मीन : शुक्र आपल्या राशीच्या सातव्या घरात संक्रमण करत आहे. आपल्या राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आपल्या प्रतिमेस नुकसान पोहचू शकते. भागीदारी व्यापारात विवाद होऊ शकतात. आरोग्य आणि वौवाहिक जीवनासाठी काळ चांगला नाही. आपण आपल्या जोडीदार सोबत भावना व्यक्त करू नका अन्यथा समस्या निर्माण होईल.

टीप: तुमच्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

About Vishal V

नियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.