सूर्य ग्रह संक्रमण: ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी आपले स्थान बदलत असतात, त्यामुळे सर्व 12 राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव हा होत असतो. 14 जानेवारीला सूर्याने मकर राशीत प्रवेश (Sun Transit In Makar 2023) केला आहे.
मकर राशीवर शनिदेवाचे राज्य असते. सूर्यदेव 13 फेब्रुवारी पर्यंत मकर राशीत राहणार आहे त्याने 3 राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. चला पाहूया त्या कोणत्या भाग्यवान राशी आहेत.
सिंह राशि : सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचे गोचर लाभप्रद सिद्ध होणार आहे. सूर्य सिंह राशीच्या पंचम भागात गोचर होत आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ प्राप्त होणार आहे, कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि आर्थिक वृद्धी होईल.
तसेच कौटुंबिक संबंध सुधारतील. सूर्यदेव सिंह राशीचे स्वामी असल्याने हा अवधी तुमच्यासाठी फलदायी असणार आहे. जर तुम्ही माणिक रत्न धारण केले तर ते तुमच्यासाठी भाग्यदायक सिद्ध होऊ शकते.
मीन राशि : सूर्या देवाचे हे राशी परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी लाभकारी सिद्ध असणार आहे. आपल्या राशीच्या 11व्या भावात ते संचारत आहे त्यामुळे तुमचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे आणि अनेक लाभ प्राप्त करून देणार आहे. याकाळात शेअर बाजरात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना चांगला लाभ होणार आहे.
आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. व्यापारी वर्गाचे उत्त्पन्न वाढताना दिसणार आहे. मीन राशी हि गुरु ग्रहाच्या अधिपत्य खाली येते, गुरु आणि सूर्य ह्यांच्या मध्ये मैत्री भाव आहे. 13 फेब्रुवारी पर्यंतचा काळ मीन राशीच्या लोकांना शुभ सिद्ध होण्याचे संकेत आहे.
मेष राशि : मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर सिद्ध होणार आहे. सूर्याचे गोचर होणे हे मेष राशीच्या कर्म भावात होत आहे त्यामुळे कार्यक्षेत्रात आणि नोकरीच्या स्थानी मान सन्मान मिळणार आहे.
ह्या काळात व्यापारी क्षेत्रातील लोक आपला व्यापार विस्तार करू शकतात. तसेच नोकरीपेक्षा लोकांना अनेक संधी प्राप्त होणार आहेत, ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात होत्या त्यांना आता चांगली नोकरी मिळू शकते.