Breaking News

Chanakya Niti: कोणाला पारखण्यासाठी चाणक्याच्या या तीन पद्धती येतील कामी

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक विद्वान व्यक्ती होते, आपल्या नीतीच्या आधारावर पूर्ण शासन बदलून देण्याची क्षमता होती. चाणक्य एक बुद्धिशाली व्यक्ती म्हणून सर्वांसमोर उत्तम उदाहरण आहे. असे बोलले जाते कि, त्यांची नीती इतकी प्रभावी होती कि त्यांनी साधारण बालकाच्या हाती पूर्ण शासन सुपूर्त केले होते. ते बालक दुसरे कोणी नसून चंद्रगुप्त मौर्य होते. आचार्य लोकांना जीवन कसे जगावे ह्याबद्दल शिकवण देत असत त्या ग्रहाला आज चाणक्य नीती ह्या नावाने ओळखले जाते. चाणक्य नीती मधील सर्व गोष्टी व्यक्तीला अनेक वेगवेगळ्या परिस्तिथीत मार्गदर्शक ठरू शकतात.

Chanakya Niti
Chanakya Niti: कोणाला पारखण्यासाठी चाणक्याच्या या तीन पद्धती येतील कामी

चाणक्य यांचे विचार जीवनात स्वीकारले तर काय बरोबर आणि चूक ह्यामध्ये भेद समजणे शक्य होऊ शकते. चाणक्याने हे देखील सांगितले आहे कि, व्यक्तीला पारखण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या पाहिजे. चला त्या पद्धती बद्दल माहिती करून घेऊ.

त्याग करण्याची भावना

चाणक्य सांगतात कि, जीवनात त्याग करणे सोपे नाही आहे. जर तुम्हाला कोणाला पारखायचं असेल तर, त्याव्यक्तीची त्याग करण्याची भावना किती आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर ती व्यक्ती दुसऱ्याच्या सुखासाठी आपले सुख त्याग करू शकत असेल तर अशी व्यक्ती कधी कोणाला धोका देऊ शकत नाही. अशी व्यक्ती जी दुःखाच्या वेळी किंवा कठीण प्रसंगी तुमच्या सोबत उभी राहू शकत नाही त्या व्यक्ती पासून लांब राहा. अशी व्यक्ती धोखा देण्या बरोबरच तुम्हाला नुकसान देखील पोचवू शकते.

हे पण वाचा : Chanakya Neeti: राग करण्यापूर्वी लक्षात ठेवा यागोष्टी, नाही बिघडणार परिस्तिथी

पैसे परत देण्याची नियत 

पैसा एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे सहसा कोणत्या हि व्यक्तीची नियत खराब होऊ शकते. परंतु जगात असे पण काही लोक आहेत ज्यांच्यासाठी पैशांपेक्षा दुसरे काही महत्वाचे असते. एखाद्याची नियत पारखायची असेल तर त्यांना पैसे द्या, जर ते पैसे परत करतात तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. तसे चाणक्य सांगतात कि, पैशांच्या घेण्यादेण्याने चांगले नाते संबंध खराब होऊ शकतात.

स्पष्ट राहणारे 

आचार्य चाणक्य सांगतात कि, जी व्यक्ती स्पष्ट असते ती आपल्या खरेपणामूळे दुसऱ्यांच्या नजरेत वाईट ठरू शकते पण त्यांच्या मनात वाईट हेतू नसतात. जर कोणती व्यक्ती खरं बोलत आहे आणि नेहमी कोणाला न खबरता सत्याची बाजू घेते अशा व्यक्तींच्या सोबत तुम्ही जरूर संपर्कात राहिले पाहिजे. आचार्य सांगतात कि, जी जी व्यक्ती निस्वार्थपणे तुमचे भले करते आणि सत्याची साथ देते ती व्यक्ती परकी असून देखील जवळील असते.

About Leena Jadhav