लोकप्रिय समजुती नुसार तुरटीचे काही उपाय खूप प्रभावी आहेत, असे मानले जाते की या उपाय योजना केल्यास जीवनातील अडचणी सुटतात. सर्वजण तुरटीच्या औषधी गुणांबद्दल जागरूक आहेत.

परंतु आपणास माहिती आहे काय प्रचलित विश्वासा नुसार तुरटीचे काही उपाय खूप प्रभावी आहेत. असे मानले जाते की या उपाय योजना केल्यास जीवनातील अडचणी सुटतात. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या अडचणी सुटण्यास मदत होईल.

१) लोकप्रिय विश्वासांनुसार, मीठ किंवा तुरटीमध्ये नकारात्मकता स्वतःत सोसण्याचे गुणधर्म असतात. आपल्या घरातल्या बाथरूम मध्ये मीठ किंवा तुरटी भरलेला एक बाउल ठेवा, आणि दर महिन्याला बाउल मधील मीठ किंवा तुरटी बदला. ज्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होईल.

२) जर आपल्या घरात वाद विवाद भांडण होत असेल तर, रात्री पलंगाच्या खाली एका ग्लासमध्ये तुरटी आणि पाणी टाकून ठेवा. सकाळी ते पाणी पिपळाच्या झाडाला टाका. अशी मान्यता आहे कि असे केल्याने घरातील कलह दूर होतात.

३) जर आपण कर्जामुळे त्रस्त असाल तर आपण हा उपाय करून पाहू शकता. विड्याच्या पानावर थोडीशी तुरटी, कुंकू टाकून बांधा आणि बुधवारी सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली शिंपडा. हे काम तीन बुधवारी करा. आपणस कर्ज परतफेड करणे सोपे होईल.

४) घराचे वास्तुदोष दूर करण्यासाठी, तुरटीचा तुकडा खूप प्रभावी मानला जातो. घराच्या प्रत्येक खोलीत आणि कार्यालयाच्या कोणत्याही कोपऱ्यात 50 ग्रॅम तुरटी ठेवल्यास वास्तूतील दोष काही प्रमाणात कमी होतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.