Breaking News

Chanakya Niti: वाईट काळात पाळा आचार्य चाणक्यांचे हे शब्द, सहज मात कराल प्रत्येक अडचणीवर

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान आणि भारतातील सर्वात कुशल रणनीतिकार होते. त्याला अर्थशास्त्राचीही उत्तम समज होती, ज्यामुळे लोकांना शतकानुशतके यश मिळवण्यात मदत झाली आहे. चाणक्याने आपल्या धोरणांच्या बळावर चंद्रगुप्त मौर्या या सामान्य मुलाला सम्राट बनवले. हीच तत्त्वे तुम्हाला जीवनातील तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करू शकतात.

या पुस्तकातील तत्त्वे तुम्हाला दृढनिश्चयासह कोणत्याही अडचणीचा सामना करण्यास मदत करू शकतात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्र या पुस्तकातही या तत्त्वांचा उल्लेख केला आहे, जे कठीण असताना अडचणींवर मात करण्यास मदत करू शकतात. चांगल्या काळात ही तत्त्वे अंगीकारली तर कालांतराने चांगला काळ येईल. ते काय आहेत ते जाणून घेऊया.

Chanakya Niti vichar
Chanakya Niti: वाईट काळात पाळा आचार्य चाणक्यांचे हे शब्द, सहज मात कराल प्रत्येक अडचणीवर

साहस आणि संयम

चाणक्य यांच्यामते साहस आणि संयम ठेवल्याने मनुष्य सर्व अडचणीचा खंबीरपणे मुकाबला करू शकतो. मनुष्याने वाईट काळात नेहमी साहस आणि संयम राखला पाहिजे. ह्या काळात साहस आणि समजदारीने कोणताही निर्णय घेतला पाहिजे. वाईट काळात कोणते हि कार्य केले तर ते चुकीचेच होते त्यामुळे वाईट काळात संयम राखून ठेवा.

Chanakya Niti: या लोकांपासून ठेवा अंतर, नाहीतर करावा लागेल आयुष्यभर पश्चाताप

धैर्य

चाणक्य यांच्यामते मनुष्याने वाईट काळात धैर्य राखले पाहिजे. कोणत्याही परिस्तितीला न भीत सामोरे जा. भीती वाटल्याने म्हणजेच घाबरल्याने तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. वाईट काळात जास्त करून मनुष्य आपले धैर्य गमावते. मनुष्याने कधी हि वाईट काळात धैर्य गमावू नये. ज्याप्रकारे दिवस नंतर रात्र आणि रात्री नंतर दिवस येते त्याच प्रमाणे वाईट काळ गेल्या नंतर चांगला काळ पण येत असतो. त्यामुळे वाईट काळात कठीण प्रसंगी धैर्य गमावू नका.

आत्मविश्वास

चाणक्य यांच्या मते काही हि कठीण प्रसंगी व्यक्तीने आत्मविश्वास गमावू नये. आत्मविश्वास असेल तर मनुष्य मोठ्यात मोठ्या अडचणीतून सहज मार्ग काढू शकतो. जर तुम्ही मनातून हार पत्करली तर तुम्ही यश प्राप्त करू शकणार नाही. हे तर असे कि जर तुम्ही मनातून जिंकला तर तुम्ही जिंकलं आणि मनातून पराभूत झाला तर पराभूतच होणार. ह्यासाठी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा कधी हि स्वतःचा आत्मविश्वास गमावू देऊ नये.

About Leena Jadhav