Chanakya Niti: आचार्य चाणक्य एक चांगले शिक्षक असून ते एक महान कूटनीतिज्ञ, रणनीतिकार आणि अर्थशास्त्री होते. चाणक्याची नीती आज पण प्रसिद्ध आहे. जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी लोक आजपण या नीतीचे पालन करतात. नीती शास्त्रात प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केला आहे.
नीती शास्त्र अशा ३ गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्या व्यक्तीच्या नेहमी सोबत राहतात. या गोष्टी अशा आहेत की मरे पर्यंत त्या माणसाची साथ सोडत नाहीत. बघू या कोणत्या आहे त्या गोष्टी.

विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्र गृहेषु च।
व्याधितस्यौषधं मित्र धर्मो मित्रं मृतस्य।।
ज्ञान
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार ज्ञान हे माणसाचे सर्वात मोठे शास्त्र आहे. ते माणसा सोबत जीवनभर सोबत राहते. जीवनात सर्वजण आपली साथ सोडतील पण ज्ञान हि एक अशी गोष्ट आहे जी कायमची तुमचा सोबत राहील. बुद्धीच्या बळावर प्रत्येक व्यक्ती कोणत्याही कठीण परिस्थितिचा सामना करू शकतो. विद्दे पासून व्यक्तीला यश प्राप्त होते.
Chanakya Niti: जीवनामध्ये यश मिळण्यासाठी, अशा स्वभावाचा करा त्याग
औषधी
आजारा पासून मुक्ती मिळवण्यासाठी औषध ही खऱ्या मित्रा प्रमाणे काम करते. यांच्यामुळे व्यक्ती लवकर चांगली, स्वस्थ होते. औषधीच्या बळावर व्यक्ती कितीही आजारी असली तरी ती लवकर चांगली होते. औषधीमूळे आपले आरोग्य चांगले राहते.
धर्म
आचार्य चाणक्याचा मतानुसार व्यक्तीने धर्माला संपत्तीच्या वर ठेवायला हवे. धर्म फक्त व्यक्तीच्या जिवंत असताना सोबत असते असे नाही, तर ते मृत्यु नंतर पण आपल्या सोबत राहते. धर्म व्यक्तीला चांगल्या व खऱ्या मार्गा वर चालण्याची प्रेरणा देते. धर्म आणि कर्मा मूळे माणूस मेल्या नंतरही नेहमी आठवणीत राहतो.