Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे महान मुत्सद्दी होते. त्यांनी नितीशास्त्राची निर्मिती केली. निती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस आपले जीवन यशस्वी करू शकतो. ही धोरणे पूर्वी होती तितकीच आजही प्रासंगिक आहेत.

तुम्ही लोकही जीवनात यश मिळवण्यासाठी या धोरणांचे पालन करा. आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्यानुसार पती-पत्नीच्या नात्यात काही गोष्टी येऊ देऊ नयेत, जर त्या आल्या तर त्यांचे नाते बिघडू शकते.
संशय
आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच्या नात्यात कधीही संशय येऊ नये. चांगल्या चांगल्या लोकांचे संसार संशयामुळे खराब झाले आहेत. संशयामुळे पती-पत्नीचे नाते पूर्णपणे बिघडते. संशय तुमच्या नात्यात विष विरघळवण्याचे काम करते. पती-पत्नीचा एकमेकांवर विश्वास असायला हवा, तरच ते नाते टिकते.
Chanakya Niti: ध्येय साध्य करण्यासाठी आचार्य चाणक्या यांनी सांगितलेल्या या 3 गोष्टी लक्षात ठेवा
अहंकार
आचार्य चाणक्याचा मते पती पत्नीचा नात्यांमध्ये कधीही अहंकार भाव नाही पाहिजे. अहंकार राहिले तर नाते खूप खराब होईल या पासून दूरच राहिले तर बर. पति-पत्नी नात्यांमध्ये अहंकाराला काहीच जागा नको.
खोटे
आचार्य चाणक्यच्या मतानुसार पती आणि पत्नी नात्यांमध्ये खोटे जर बोलले तर ते नाते पोकळ बनवते. विश्वासघात केल्या सारखे होते. ते नाते टिकत नाही कमजोर पडते. त्यामुळे या नात्यांत खोटे बोलणाऱ्या जागा नाही आहे. हे नाते समजदारीने खरे बोलून निभावा.
अनादर
आचार्य चाणक्य मतानुसार पती आणि पत्नीनी एक दुसऱ्याचे सम्मान केले पाहिजे. कधीपण एक दुसऱ्याचा अपमान करू नये, एकमेकांना आदर द्यावा. अनादर केल्याने तुमचे नाते बेरंग होते, त्यामुळे तुमच्या मर्यादेत राहा.