Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार बहुतेक लोकांना कठीण आणि कठोर वाटतात. परंतु त्यांचे शब्द हे जीवनाचे खरे सत्य आहे. त्यांचे शब्द आजपण लोकांना मार्गदर्शन करतात. चाणक्यांनी प्रगती करण्यासाठी अनेक रहस्ये सांगितली आहेत, ज्यांनी ती माहिती करून घेतली आहे, त्यात डोकावले आहे, अपयश त्यांना स्पर्शही करू शकत नाही.

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीमध्ये सांगितले आहे की, दुःखी लोकांना तीन गोष्टींनीच शांती मिळते. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी दुःखी लोकांना शांती देतात.
दुःखी लोकांना या गोष्टींने शांती मिळते
आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या प्रमाणे दूध न देणारी आणि गर्भ धारण न करणारी गाई पासुन काही लाभ नाही. तसेच मुलगा जर विद्वान असेल आणि आई-वडिलांची सेवा करत नसेल तर त्याच्यापासून काही फायदा होऊ शकत नाही.
चाणक्यांच्या मते एक योग्य मुलगा जीवनात आपल्या आई बाबाना स्वर्ग सारखे सुख देऊ शकतो. यामुळे मुलाच्या शिक्षा आणि स्वभावावर विशेष लक्ष दिले पाहिजे.
आचार्य चाणक्य सांगतात सुखी जीवनासाठी सद्गुणी स्त्रीच्या कार्यामुळे घरात कोणतीही कमतरता नसते.
चाणक्य नीतीनुसार, एक सद्गुणी स्त्री प्रत्येक कठीण क्षणाला तोंड देऊन आपल्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करते.
तसेच चांगल्या माणसाच्या संगतीमुळे माणसाचे चांगले होणे निश्चित आहे. चाणक्य सांगतात की नेहमी असा लोकांची संगत ठेवा ज्यांनी तुम्ही प्रगती कराल.
चाणक्य नीतिच्या मते, वाईट संगत असलेल्या लोकांपासून अंतर राखणे आवश्यक आहे. अशा लोकांच्या सहवासात राहिल्याने माणसाचा नाश होतो.
हे पण वाचा: माणसाने या प्राणी आणि पक्षांच्या या गुणां मधून घेतली पाहिजे शिकवण