Chanakya Niti: महिलां बद्दल आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, महिलेचे स्थान नेहमी सरोत्तम असते, देव पण त्यांना सन्मान देऊन त्याची पुजा करतात. यामुळे समाजात त्यांच्या भूमिकांना दुर्लक्षित करू शकत नाही आणि तसे केले पाहिजे. उत्तम समाज घडवण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे.

आचार्य मानतात की पुरुषांसारखे महिलाच्या शिक्षणावर पुर्ण लक्ष दिले पाहिजे. सुशिक्षित आणि पात्र महिलांच्या कुटुंबातील मुली पण मोठे नाव कमावतात आणि कुटुंबाचा नावलौकिक वाढवतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची प्रगती हवी असेल तर महिलांना नक्कीच शिक्षित करा.
हे पण वाचा: व्यापार करण्यांसाठी खूप कामाच्या आहे चाणक्य यांच्या या नीती
आचार्य सांगतात की शास्त्रात महिलांना लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. यामुळे त्यांचा नेहमी सन्मान केला पाहिजे. ज्या कुटुंबात महिला आनंदी राहत नाही, त्यांच्या घरात कधी बरकत सुख समृद्धी येत नाही म्हणून त्यांना नेहमी आदर सम्मान द्या.
जर स्त्री शिक्षित असेल तर तिच्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग होऊ द्या. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग होऊ दिला नाही तर त्यांचे शिक्षण व्यर्थ जाते. त्यासाठी त्यांच्या कलागुणांना घराघरात आणि समाजात वाव मिळू द्या. यातून चांगला समाज निर्माण होतो.
आचार्य सांगतात की जीवनाचे कोणते पण लक्ष्य महिलांच्या सहकार्यानेच ते पूर्ण होऊ शकते, त्या निम्म्या लोकसंख्येचा भाग आहेत. म्हणूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष करून हा संपूर्ण समाज कधीच प्रगती करू शकत नाही. जिथे महिलांकडे दुर्लक्ष होते, त्याची किंमत संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागते.