Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी एक श्लोकद्वारे 4 असा परिस्थिती बद्दल सांगितले आहे. जर या परिस्तिथी कोणत्या माणसाच्या जीवनात आल्या तर त्यांच्यासाठी जीवन जगणे पण आवघड होऊन जाते. तो प्रत्येक क्षणी गुदमरून जीवन जगतो.
कान्तावियोगः स्वजनापमानं ऋणस्य शेषं कुनृपस्य सेवा, दारिद्र्यभावाद्विमुखं च मित्रं विनाग्निना पञ्च दहन्ति कायम्
चाणक्याच्या वरील श्लोकचा अर्थ पुढील प्रमाणे समजून घेऊया.

आचार्य चाणक्यांनी सांगितले होते की जर पती आपल्या पत्नी पासून विभक्त झाला तर त्याचे जीवन दुःखात बुडते कारण पत्नी आपल्या पतीच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेते. बायको गेल्यावर त्यांची तशी काळजी घेणारं कुणीच नसतं. अशा परिस्थितीत माणूस प्रत्येक क्षणी आपल्या पत्नीचा विचार करतो. पत्नीच्या दु:खात तो प्रत्येक क्षणी आतून रडतो.
आचार्य म्हणतात की जर कोणत्या माणसाला आपल्याच परिवारच्या लोकांचा अपमान सहन करावा लागला, तर जीवन त्यांच्यासाठी ओझ्यासारखे होते. अशा परिस्थितीत, माणूस तो अपमान विसरू शकत नाही आणि अपराधीपणाने भरून जातो. अशा स्थितीत त्याला प्रत्येक क्षणी गुदमरल्यासारखे वाटते.
हे पण वाचा: आत्मसात करा ह्या युक्ती कठीण काळात प्रत्येक समस्येतून सहज मार्ग काढू शकाल
एखाद्या व्यक्ती कडून जर कर्ज घेतले आणि इच्छा असूनही ते कर्ज फेडू शकली नाही, तर ही परिस्थिती त्याचे जगणे कठीण करते. अशा लोकांसाठी रात्रीची झोप आणि दिवसाची शांतता सर्व नाहीसे होते. ते आतून गुदमरून जगतात.
आचार्यांनी गरिबीला सर्वात मोठा शाप मानला आहे. आचार्य चाणक्य सांगतात की, गरिबांच्या जीवनात सुख नाही आणि त्यामुळे तो आपल्या मनात भटकत राहतो. सुख मिळवण्याच्या हव्यासापोटी असा माणूस कधी कधी चुकीच्या मार्गावर जातो, त्यामुळे त्याचे जीवन अधिक कष्टमय होते.