Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे महान राजकीय आणि मुत्सद्दी होते. त्यांनी नितीशास्त्राची निर्मिती केली. निती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. यामध्ये वैवाहिक जीवन, करिअर, आरोग्य, नातेसंबंध आणि नोकरीशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस आपले जीवन यशस्वी करू शकतो.

आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रसंगावर, मोठ्या समस्यांवर सहज मात करता येते. आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये पैशाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पैसा कसा सांभाळावा, तो कसा खर्च करावा हे आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींचे पालन केल्याने माणसाला कसे यश मिळते हे सांगत आहे व लक्ष्मीची कृपा सदैव राहते. जाणून घेऊया काय आहेत यागोष्टी.
१. आचार्य चाणक्याचा मते माणसाने पैशा बद्दल विचार करूण कधीही असंतोष नसायला पाहिजे. या व्यतिरिक्त सुंदरता आणि जेवण यासाठी देखील असंतोष नसायला पाहिजे.
२. आचार्य चाणक्याचा मते आपल्याला जर ज्ञान नसले तर आपले जीवन अपुरे आहे. ज्ञान नसले तर माणसाला सफलता मिळत नाही, ह्यासाठी ज्ञान प्राप्त करणे अनिवार्य आहे.
३. चाणक्याच्या मते कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याच्या पहिले चांगल्या आणि वाईट गोष्टीचा विचार केला पाहिजे. यामुळे आपल्याला जीवनात कोणत्याही प्रसंगाचा सामना करावा लागत नाही.
४. आचार्य चाणक्या यांच्यामते लग्ना नंतर दुसऱ्या स्त्रीसाठी आकर्षित व्हायला नाही पाहिजे. या गोष्टी तुमच्या वैवाहिक जीवनासाठी त्रासेचे कारण बनू शकते.
५. चाणक्य म्हणतात असा लोकांशी दोस्ती करू नका ज्यांना तुमच्यापेक्षा कमी-जास्त प्रतिष्ठा आहे. असा लोकांची दोस्ती तुम्हाला कधीही आनंद देऊ शकत नाही. या कारणांमुळे तुम्हाला अपमान सहन करावा लागतो.
६. आचार्य चाणक्यांचा मतानुसार नेहमी इतरांच्या चुकांमधून शिका. असे करणारे लोकांना नेहमी अफाट यश प्राप्त होते. असे लोक जीवनामध्ये सर्वात पुढे असतात आणि अफाट यश प्राप्त करतात.