Chanakya Niti: आचार्य चाणक्यानी आपल्या नीतीशास्त्रात सांगितले आहे कि, जीवना मध्ये कोण कोणत्या प्रकारचे यश प्राप्त करू शकतो. चाणक्य यांच्या मतानुसार एक छोटी मुंगी सुद्धा माणसाला जीवनाचे महत्त्वाचे धडे शिकवू शकते. आचार्य चाणक्य हे कुशल वक्ते, त्यांचे शब्द आजच्या युगातही खरे ठरतात. आचार्य चाणक्य जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जाते. बघूया आचार्य चाणक्यांनी कोणत्या पक्षांच्या गुणांमूळे मनुष्य त्यांच्या जीवनात यश प्राप्त करू शकते.

बगळ्या कडून हे गुण घ्यावेत
इंद्रियाणि च संयम्य बकवत् पंडितो नरः।
वेशकालबलं ज्ञात्वा सर्वकार्याणि साधयेत्।।
या श्लोकामध्ये आचार्य चाणक्य म्हणतात कि व्यक्तीला यश मिळायला बगळ्याचे गुण सर्वात जास्त उपयोगी पडतात. चाणक्य म्हणतात कि, बगळा आपल्या सर्व इंद्रियांना चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवतो. यशासाठी इंद्रियांवर चागंल्या प्रकारे नियंत्रण ठेवणे फार जरुरी आहे. एखादी व्यक्ती जर आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकली नाही तर, त्यांचे मन व्याकुल राहते. लक्ष केंद्रित केल्याने यश मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
Chanakya Niti: या ४ कारणांमुळे उद्भवू शकतात जीवनामध्ये समस्या
कोकिळे कडून हे गुण घ्यावेत
तावनमौनेन नियंते कोकिलाश्चैव वासरः।
यवत्सर्वं जनानंददायिनी वन प्रवर्तते ॥
आचार्य चाणक्य आपल्याला या श्लोकामध्ये महत्वपूर्ण शिक्षा देत आहे. आचार्य म्हणतात कि माणसाचे वागणे वाणीतून कळते. चाणक्य यांनी नीतीशास्त्रा मध्ये सांगितले आहे कि, कोकिळा जो पर्यंत गोड बोलत नाही तो पर्यंत मौन ठेवते, अशा प्रकारे चांगले बोल न बोलता येणाऱ्यांनी शांत राहायला पाहिजे. कारण गोड बोलणे मित्रांना आमंत्रण देते आणि शत्रूंना कडूपणा देते. म्हणून म्हणतात कमी बोला पण गोड बोला.
कोंबड्या कडून हे गुण घ्यावेत
प्रत्युत्थानं च युद्ध च संविभागं च बन्धुषु।
स्व्यमाक्रम्य भुक्तं च शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात्।।
चाणक्याच्या नीतीनुसार म्हटले आहे कि आळस हा शत्रूसारखा असतो. यामुळे व्यक्तिला म्हणूनच सूर्योदयापूर्वी उठण्याचे गुण कोंबड्या कडून शिकले पाहिजेत. त्याच वेळी, कोंबडा अन्न वाटून खातो आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांशी जोरदार स्पर्धा करतो.