Breaking News

Chanakya Niti: या प्रवृति लोक होतात दुसऱ्याच्या स्वार्थीपणाचे शिकार होतात

Chanakya Niti: आचार्य चाणक्य एक असे विद्वान व्यक्ती आहे ज्यांनी एक शिक्षकाची भूमिका देखील पार पडली आहे. आचार्य फक्त एक कूटनीतिज्ञ नव्हते तर त्यासोबत ते रणनीतीकर आणि अर्थशास्त्री देखील होते. त्यांनी सांगितलेले गोष्टी आज देखील प्रासंगिक आहे, आताच्या जीवनात देखील त्या लागू होतात.

Chanakya Niti vichar
Chanakya Niti: या प्रवृति लोक होतात दुसऱ्याच्या स्वार्थीपणाचे शिकार होतात

नीतिशास्त्र या ग्रंथा मधून चाणक्य यांनी समाजाचे मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार जीवनात प्रगती आणि यशस्वी होण्याच्या लोभामुळे काही लोक दुसऱ्या व्यक्तीचा वापर करून घेते. चलाख लोक स्वतःचे नुकसान झाले तरी काही लोकांचा पिच्छा सोडत नाही.

चाणक्य नीतिशास्त्रातील पुढील श्लोकाद्वारे सांगतात कि, कोणत्या प्रकारच्या लोकांच्या फायदा करून घेतला जातो.

नात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् ।

छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः ॥

ह्या श्लोकामध्ये चाणक्य सांगतात कि, व्यक्तीने मर्यादेपेक्षा भोळे आणि साधे दिसू नये. चाणक्य सांगतात कि, नेहमी सर्वात पहिले सरळ झाड कापले जाते आणि वाकडे झाड तसेच राहते. साध्या भोळ्या लोकांचा फायदा नेहमी करून घेतला जातो आणि ती गोष्ट त्यांना समजून देखील येत नाही.

हे पण वाचा: Chanakya Niti: यशस्वी बनायचे असेल तर, चुकून हि करू नका ह्या चुका 

अधिक विश्वास

चाणक्य नीतीनुसार कोणावर देखील विश्वास ठेवणे चांगले आहे पण, गरजेपेक्षा अधिक विशेष ठेवल्याने नुकसान सहन करावे लागू शकते. आचार्य सांगतात कि, आंधळा विश्वास करणे कोणत्याही मोठ्या संकटापेक्षा कमी नाही आहे. मर्यादे पलीकडे विश्वास ठेवल्याने नेहमी दगा होण्याची शक्यता असते. नीतिशास्त्रानुसार कोणावर पण विश्वास करा, पण आपले स्वार्थ देखील लक्षात ठेवा.

About Leena Jadhav