मनुष्य जीवनात जेव्हा पण एखाद्या व्यक्ती सोबत भेट होते तेव्हा मनात विचार येतात कि, काय हि व्यक्ती योग्य आहे. कित्येकदा आपण एखाद्याला भेटो आणि त्याच्या बोलण्याची पद्धत आवडते किंवा त्यांचे विचार चांगले वाटतात त्यावेळीस असे वाटते कि हि व्यक्ती जीवनसाथी बनण्यासाठी योग्य आहे. हळूहळू दोघांचे विचार आणि ग्रह जुळतात. काही लोक पहिल्या भेटीतच चांगले मित्र बनतात. तर काही लोक वर्षानुवर्षे भेटून सुद्धा त्याचे विचार एकमेकांशी जुळत नाही.
एक वेळ अशी येते कि, त्यांचे भांडण, वाद विवाद सुरु होतात. ज्योतिष शास्त्रानुसार अनेक राशी एकमेकांशी खूप कम्फर्टेबल अनुकूल असतात तर काही राशी एकमेकांशी प्रतिकूल असतात, अशा प्रतिकूल राशीचे लोक एकमेकांनसोबत राहू शकत नाही. चला तर बघूया कोणत्या कोणत्या राशींचे लोक आहेत ज्या परफेक्ट जोडी बनू शकत नाही.

मकर आणि मेष
चांगले विचार आणि चांगल्या राहणीमानाच्या मकर राशीच्या लोकांचे मनमौजी आणि असंयमी राहणाऱ्या मेष राशीच्या लोकांशी अजिबात जमत नाही. मेष राशीच्या नियंत्रण ठेवण्याच्या स्वभावामुळे मकर राशीचे लोक त्याच्या कडून त्रासलेले राहतात आणि त्यांच्यात खूप तणाव अनुभवायला मिळतो.
Guru Rahu Yuti: 36 वर्षां नंतर मेष राशीत गुरु राहूची युती, मेष, मिथुन सह या 5 राशींना होणार लाभ
कुंभ आणि वृषभ
कुंभ राशीवाले जिद्दी, मोकळ्या विचारांचे लोक असतात. ज्यामुळे त्यांचे अनेकदा वृषभ राशीच्या लोकांशी पटत नाही. जर कुंभ आणि वृषभ राशीच्या लोकांची जोडी बनली तर त्यांच्यात खूप भांडण होतात, छोट्या छोट्या गोष्टींवर लढाई होते. वृषभ राशीचे लोक कुंभ राशीच्या मोकळ्या विचारांशी जरा सुद्धा जुळवून घेत नाही.
मीन आणि मिथुन
मीन राशीचे लोक उत्स्फूर्त वर्तनाचे असतात, त्यामुळे अनेकदा ते मिथुन राशीच्या लोकांना समजू शकत नाही. मिथुन राशीचे लोक फक्त स्वतःबद्दलच विचार करतात, तर मीन राशीचे लोक इतरांच्या भावना, इच्छा यांची पूर्ण काळजी घेतात. तसेच मीन राशीचे लोक खूप मददगार असतात. त्यामुळे दोघांचे वागणे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, त्यामुळे दोघांनाही चांगली जोडी म्हटले जात नाही.
मेष आणि कर्क
मेष राशीचे लोक उग्र असतात. जेव्हा हे लोक चांगल्या लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. कर्क राशीचे लोक इतरांची काळजी घेतात आणि चांगले विचार करतात. एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध स्वभावामुळे त्यांना एकमेकांना साथ देताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मेष राशीचे लोक जेवढे बहिर्मुख असतात (सहजपणे व्यक्त होतात), कर्क राशीचे लोक तितकेच अंतर्मुखी असतात.
वृषभ आणि सिंह
वृषभ आणि सिंह दोघेही स्वभावाने हट्टी आहेत. सिंह राशीचे लोक फक्त स्वतःबद्दलच विचार करतात, ज्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या नैसर्गिक स्वभावामुळे समस्या येतात. सिंह राशीच्या लोकांना प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडते तर वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्याच जगात राहायचे असते, त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा भांडणे होतात.
मिथुन आणि कन्या
उत्साही आणि जिज्ञासू मिथुन राशीच्या लोकांना अतिव्यावहारिक कन्या कंटाळवाणे वाटते. मिथुन राशीचे लोक मजा आणि प्रेमावर विश्वास ठेवतात, तर कन्या राशीच्या लोकांची पहिली प्राथमिकता त्यांच्या कामाला असते. मिथुन राशीचे लोक मोकळेपणाने आपले प्रेम दाखवतात तर कन्या राशीचे लोक या बाबतीत खूप लाजाळू असतात. त्यामुळे दोघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे.
कर्क आणि तूळ
कर्क राशीचे लोक त्यांच्या प्रामाणिकपणा, स्थिरता, औदार्य आणि संवेदनशीलतेसाठी ओळखले जातात, तर तूळ चंचल आणि दिखाऊ असतात. हे दोघे एकमेकांशी पूर्णपणे विसंगत आहेत. कर्क राशीच्या लोकांना तूळ राशीच्या लोकांसोबत खूप संयमाने काम करावे लागेल आणि जेव्हा हा संयम गमावला जातो तेव्हा संबंध बिघडू शकतात.
धनु आणि मीन
धनु राशीचे लोक त्यांच्या नैतिक आणि तात्विक विचारांसाठी ओळखले जातात. धनु राशीचे लोक त्यांच्या सभोवतालचे वातावरण पूर्णपणे आनंददायी बनवतात आणि मीन राशीचे लोक स्वतःमध्ये राहतात आणि त्यांना समजणे कठीण असते. मीन राशीचे लोक खूप भावनिक असतात, जे धनु राशीच्या लोकांना समजणे कठीण होते.
सिंह आणि वृश्चिक
सिंह राशीच्या लोक ज्यांना हसणे आणि विनोद करणे आवडते, त्यांना हट्टी वृश्चिक राशीच्या लोकांशी ताळमेळ राखण्यात खूप त्रास होतो. सिंह राशीचे लोक त्यांच्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात आणि या सवयीमुळे ते नेहमी वृश्चिक राशीच्या लोकांच्या निशाण्यावर असतात. दोघांमध्ये अनेक वाद होतात, ज्याचे रूपांतर हाणामारीत होते.
कन्या आणि धनु
कन्या राशीचे लोक कोणतेही काम परिपूर्णतेने करतात आणि इतरां कडून तशीच अपेक्षा करतात. त्यांच्या या सवयीमुळे धनु राशीचे लोक मुक्त विचारांच्या व्यक्तींना त्यांच्या जीवनात हस्तक्षेप वाटत राहतात. कन्या राशीमुळे त्यांना एक प्रकारचा दबाव जाणवतो ज्यामुळे त्यांचे नाते सुरळीत होत नाही.
तूळ आणि मकर
तूळ राशीचे लोक मोकळे मनाचे असतात आणि मकर राशीचे लोक त्यांच्या चांगल्या वागणुकीसाठी देखील ओळखले जातात. मकर राशीचे लोक कधी कधी खूप कडक होतात त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना त्यांच्याशी सहकार्य करणे कठीण जाते. या दोन राशींना एकमेकांना सहज वाटत नाही.
वृश्चिक आणि कुंभ
वृश्चिक आणि कुंभ स्वभावाने एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. त्यांच्या नात्यात प्रेम आणि प्रामाणिकपणाचा अभाव आहे. ते एकमेकांसोबत पुढे जाण्यास आणि कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्यास सहमत नाहीत. यामुळे ते एकमेकांशी अजिबात जमत नाहीत.