Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या ग्रंथात चाणक्य नीतिमध्ये लिहिलेल्या खुप गोष्टी जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीला मार्गदर्शन करतात. जर माणुस या गोष्टीना जीवनात आत्मसाथ करतो तर चांगले आणि वाईट यातील फरक सहज समजु शकतो. आपल्या जीवनात येणाऱ्या कठीण परिस्थितींना टाळू शकतो. इथे पाहुया काही असा गोष्टी ज्यांना आचार्यांनी लगेच आत्मसाथ करायला सांगितले आहे.

सोन: आचार्य चाणक्य सांगतात की, जरी सोने घाणीत पडलेले असले तरी त्याची किंमत कधीच कमी होत नाही. त्यामुळे घाणीत सोने पडलेले दिसले तरी त्याला उचलायला संकोच करू नका. त्याचा नंतर कधी पण वापर करू शकतो.
चांगले गुण: आचार्य मानतात की, जर विषा मध्ये थोड पण अमृत आहे तर व्यक्तिला ते वेगळे करता आले पाहिजे. म्हणजे वाईट व्यक्तीत थोडी फार पण चांगले गुण असतात. आचार्यांच्या मतानुसार वाईट माणसात पण लोकांना चांगले गुण शोधता आले पाहिजे आणि त्याचे चांगले गुण त्वरित स्वीकारला पाहिजे.
Chanakya Niti: या 3 गोष्टीना कधी समजु नका कमजोर, ठरू शकतात घातक
ज्ञान: आचार्यांच्या मतानुसार, माणूस कोणत्याही जातीचा असो किंवा वर्गाचा असो, तो ज्ञानी असेल, तर त्याच्याकडून ज्ञान घेण्यास कधीही लाज किंवा संकोच वाटू नये. ज्ञान जिथून मिळेल तेथून घ्यावे. ज्ञान आत्मसाथ करण्यासाठी जाती-धर्माचा संकोच नसावा.
ज्ञानाचे महत्त्व सांगताना आचार्य म्हणतात की, ज्ञान हा तुमचा खरा मित्र आहे. तो तुम्हाला समाजात सन्मान, प्रसिद्धी आणि पैसा देतो. तसेच तुम्हाला महान बनवतो. मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो साथ देतो. म्हणूनच ज्ञान घेताना कोणत्याही प्रकारची शंका मनात आणू नका.